
जगात मासांहारी खाणाऱ्या पेक्षा आता शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण शरीरास अधिक मानवते. कोरोना काळापासून लोकांचा कल शाकाहाराकडे चालला आहे. आरोग्याच्या दृष्टीने मासांहारा पेक्षा शाकाहार केव्हाही चांगलाच असल्याचे म्हटले जाते. अशात आता भारतातील एक शहर जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे. कोणते हे शहर आहे हे पाहूयात…
गुजरात येथील पालीताना या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथे आता केवळ शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. पालीताना जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. येथे आता केवळ शाकाहारी पदार्थ मिळतील असे म्हटले जात आहे.
हा निर्णय जैन मुनींनी केलेल्या विरोधानंतर घेण्यात आला आहे. नॉन व्हेज भोजनावर संपूर्ण प्रतिबंध केल्यामुळे हे शहर जगभरात चर्चेत आले आहे.पालिताना शहर जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. या निर्णयामागे येथील धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे.
पालीताना गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर आहे. येथे रस्ते मार्गे येण्यासाठी किमान सात तास लागतात. जैन धर्माचे तिर्थस्थान असलेल्या या शहरात नॉन व्हेजवर बंदी घालण्यासाठी तर २०१४ पासून सुमारे २०० मुनींनी २५० तासांचे उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाची तरतूद केली. सरकारचा हा निर्णय जैन धर्मियांचा मोठा विजय मानला जातो.
नॉनव्हेज बंदीमुळे पालीताना येथे अनेक शाकाहारी रेस्टॉरंट उघडण्यात आले आहेत. येथे विविध शाकाहारी पदार्थांना वाढले जाते. भावनगरच्या पालीताना शहरावर भाजपाचे राज्य आहे. २००२ मध्ये पालीताना विधानसभा क्षेत्र बनले. येथे २०१२ चा अपवाद वगळता भाजपाचा विजय झाला आहे. या जागेवरुन निवडून आलेले आमदार केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया झाले आहेत. ते २००२ पासून येथे विजयी होत आले आहेत. पालिताना येथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील जैन धर्माचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या शत्रुंजय पर्वतावर असलेले ९०० हून अधिक संगमरवरी मंदिरांचा जगातील सर्वात मोठे आणि अनोखा परिसर होय.