गुजरात सरकारचा नव्या वाहन कायद्यात बदल, दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी घटवली

वाहन कायद्यावरुन सध्या देशात गोंधळ सुरु आहे. नव्या नियमांनुसार वाहन कायद्यातील (Vehicle rules) दंड वाढवण्यात आल्याने अनेकांनी यावर नाराजी दर्शवली आहे.

गुजरात सरकारचा नव्या वाहन कायद्यात बदल, दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी घटवली

अहमदाबाद : वाहन कायद्यावरुन सध्या देशात गोंधळ सुरु आहे. नव्या नियमांनुसार वाहन कायद्यातील (Vehicle rules) दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने अनेकांनी यावर नाराजी दर्शवली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालने दंडाची रक्कम अधिक असल्याचे सांगत हे नियम लागू करण्यास नकार दिला होता. गुजरातनेही (Gujrat) यावर विचार करु अस म्हटले होते. पण आता गुजरात सरकारने वाहन कायद्यात (Vehicle rules) बदल करत केंद्र सरकारने लागू केलेल्या दंडाच्या (Fine) रकमेत 50 टक्के घट केली आहे.

गुजरातमध्ये बदल केल्यानंतर आता विना हेल्मेट आणि सीट बेल्ट नसेल तर फक्त 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. हा दंड आधी 1000 रुपये होता. विना परवाना दुचाकी चालवल्यास 2 हजार आणि इतर वाहनांसाठी 3 हजार दंड आकारला जाईल. नव्या नियमानुसार हा दंड 5 हजार आहे.

नवीन नियमानुसार ट्रिपल सीट दुचाकी चालवल्यास 1 हजार दंड आहे, पण गुजरातमध्ये 100 रुपये दंड द्यावा लागणार आहे. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यास 1500, हलक्या गाड्यांना 3 हजार आणि इतर गाड्यांसाठी 5 हजार रुपये दंड द्यावा लागेल. ओव्हार स्पिडिंग दुचाकी चालवल्यास 1500 रुपये द्यावे लागणार आहेत. हा दंड नव्या नियमामध्ये 2 हजार आहे.

नव्या नियमांवर एक नजर

1. विनातिकीट प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड

2. अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड

3. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड

4. अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड

5. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड

6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड

7. दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड

8. ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड

9. वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

10. वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड

11. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड

12. सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड

13. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द

14. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द

15. अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड

16. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड

17. अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *