Turbofan Engine : ज्या प्रोजेक्टला फेल मानलं, HAL ने तीच गोष्ट दाखवली करुन, भारताला टर्बोफॅन इंजिनच्या विकासात मोठं यश

Turbofan Engine : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तब्बल 10 वर्ष कठोर मेहनत, परिश्रम करुन जी गोष्ट अशक्य वाटत होती, ती शक्य करुन दाखवली आहे. टर्बोफॅन इंजिनच्या विकासात भारताल महत्वपूर्ण मोठं यश मिळालं आहे.

Turbofan Engine : ज्या प्रोजेक्टला फेल मानलं, HAL ने तीच गोष्ट दाखवली करुन, भारताला टर्बोफॅन इंजिनच्या विकासात मोठं यश
Turbofan Engine
| Updated on: Aug 07, 2026 | 2:22 PM

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. स्वसंरक्षणासाठी भारताने अनेक आयुधांची निर्मिती केली आहे. पण फायटर जेटचं इंजिन हे सध्याच्या घडीला भारतासमोरच मुख्य आव्हान आहे. पण या दरम्यान दुसरी एक चांगली बातमी आहे. फायटर जेटचं इंजिन स्वबळावर बनवणं शक्य झालं नसलं तरी टर्बोफॅन इंजिनच्या बाबतीत मात्र भारताने चांगली प्रगती केली आहे. भारत स्वत:चा स्वदेशी टर्बोफॅन इंजिन बनवत आहे. हे कुठलं सामान्य इंजिन नाहीय. मोठ्या विमानांमध्ये हे इंजिन बसवलं जातं. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने हे इंजिन तयार केलय. या टर्बोफॅन इंजिनकडे एकवेळ फेलियर म्हणून पाहिलं जात होतं. पण हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तब्बल 10 वर्ष कठोर मेहनत, परिश्रम करुन टर्बोफॅन इंजिन विकसित करण्यात यश मिळवलं आहे. भारताचं हे टर्बोफॅन इंजिनचं मिशन काय आहे? समजून घेऊया.

HAL ने स्वदेशी HTFE-25 इंजिनच्या सर्वात महत्वपूर्ण भागाची कठोर चाचणी केली. यात अधिकतम 99.5 टक्के स्पीडचा टप्पा यशस्वीरित्या गाठला. एका दशकाचा दीर्घ संघर्ष आणि फेलियरच्या टॅगनंतर HAL ने हे यश मिळवलं आहे. भारताचं स्वदेशी इंजिनचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे. टर्बोफॅन इंजिन-25 हे एक स्वदेशी विमान इंजिन आहे. 25 किलो न्यूटन थ्रस्टच्या निर्मितीसाठी हे इंजिन डेवलप करण्यात आलं आहे. 2013 साली बंगळुरुच्या HAL एयरो इंजन रिसर्च एंड डेवलपमेंट सेंटरमध्ये या प्रोजेक्टची सुरुवात झालेली.

या इंजिनचा कुठल्या विमानांमध्ये वापर होईल?

हे एक लो-बायपास, ट्विन-स्पूल टर्बोफॅन इंजिन आहे. बेसिक मिलिट्री ट्रेनर विमान, एडवांस्ड ट्रेनर विमान, छोटी बिझनेस जेट, ड्रोन आणि भविष्यातील स्वदेशी मानवरहित लढाऊ विमानांचा विचार करुन हे इंजिन विकसित करण्यात आलं आहे. HAL नुसार, सिंगल इंजिन कॉन्फिगरेशन जवळपास 5 टनापर्यंतच्या विमानाला शक्ती देऊ शकतं. ट्विन इंजिन कॉन्फिगरेशन 9 टनापर्यंतच्या विमानासाठी उपयोगी ठरु शकतं. HJT-36 आणि CATS सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये या टर्बोफॅन इंजिनचा वापर होऊ शकतो.

त्यामुळे इंजिन विकासाला गती मिळाली

या आव्हानाचा सामना करण्यासाठी HAL ने डिसेंबर 2023 मध्ये जवळपास 10000 वर्ग मीटर क्षेत्रात नवीन डिझाइन आणि टेस्टिंग फॅसिलिटी सुरु केली. नव्या फॅसिलिटीमुळे टेस्टिंग क्षमता वाढली. त्यामुळे इंजिन विकासाला गती मिळाली. या प्रोजेक्टमधली सर्वात खास बाब म्हणजे HAL ने प्रामुख्याने यासाठी आपल्या अंतर्गत कॉर्पोरेट फंडाचा वापर केला. म्हणजे हा प्रोजेक्ट फंडिंगसाठी एअरफोर्स आणि संरक्षण मंत्रालयावर अवलंबून नव्हता. त्यातून टेक्नोलॉजीच्या विकासात पूर्णपणे मोकळीक मिळाली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us