AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holiday: आज किंवा उद्या बँकेत कामानिमित्ताने जाण्याआधी ‘ही’ बातमी वाचाच! कुठे बँका बंद राहणार जाणून घ्या

Bank Holiday in Maharashtra: तुम्हाला जर आज आणि उद्या मध्ये बँकेत काही कामानिमित्ताने जायचं असेल तर आधी महाराष्ट्रात ९ आणि १० नोव्हेंबरला नेमक्या कुठे बँका सुरु आहेत आणि कुठे बंद हे जाणून घ्या.

Bank Holiday: आज किंवा उद्या बँकेत कामानिमित्ताने जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच! कुठे बँका बंद राहणार जाणून घ्या
Bank Holiday Alert on 9, 10 November 2026
| Updated on: Nov 09, 2026 | 8:13 AM
Share

Bank Holiday Alert on 9, 10 November 2026: दिवाळीत अनेक ठिकाणी सुट्ट्या असतात. बँकांनाही सुट्टी असते. सुट्ट्यांबाबत, विशेषतः ९, १० किंवा ११ नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील का? याबद्दल अजूनही काही संभ्रम आहे. याशिवाय महाराष्ट्रात नेमक्या बँका कधी बंद कधी सुरु याबद्दलही लोकांना संभ्रम आहे. यावर्षी दिवाळी रविवार, ८ नोव्हेंबर रोजी आली होती. रविवार असल्याने देशभरातील बँका आधीच बंद होत्या. मात्र, दिवाळी आणि त्याशी संबंधित सणांमुळे आगामी आठवड्यात विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. काही राज्यांमध्ये ९ नोव्हेंबर रोजी बँका बंद राहतील, तर इतर काही राज्यांत १० आणि ११ नोव्हेंबर रोजी बँका बंद असतील. याव्यतिरिक्त, दुसरा शनिवार आणि रविवार असल्यामुळेही बँका बंद राहतील. देशाच्या विविध भागांत हा प्रकाशाचा उत्सव वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, त्यामुळे बँकांची सुट्टीही राज्यानुसार वेगवेगळी असू शकते.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेच्या शाखेत काही काम असेल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी सुट्ट्यांची ही यादी नक्की तपासणे महत्त्वाचे आहे. आज, ९ नोव्हेंबर रोजी आणि १० नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील बँका सुरू आहेत की बंद, याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.

९ नोव्हेंबर रोजी कोणत्या शहरांमध्ये बँका बंद?

दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजेनिमित्त सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी आगरतळा, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, जयपूर, कानपूर, लखनऊ आणि रायपूर परिसरातील बँका बंद राहतील. या ठिकाणच्या बँकांच्या शाखांचे कामकाज सुरू राहणार नाही.

१० नोव्हेंबर रोजी कुठे बँकांना सुटी?

दिवाळी बलीप्रतिपदा आणि विक्रम संवत नववर्षाच्या निमित्ताने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी अहमदाबाद, बेलापूर (नवी मुंबई), बेंगळुरू, डेहराडून, गंगटोक, मुंबई आणि नागपूर येथील बँका बंद राहतील.

नोव्हेंबर 2026 बँकांना कधी कधी सुट्ट्या?

दिवाळी/लक्ष्मी पूज/गोवर्धन पूजा/विश्वकर्मा दिवस, दिवाळी (बळी प्रतिपदा)/दीपावली (गोवर्धन पूजा)/लक्ष्मी पूजा/विक्रम संवंत नववर्ष दिन, लक्ष्मी पूजा (दीपावली)/निंगोल चक्कौबा/भ्रातृद्वितीया/भत्रिद्वितिया/चक्कुबा उत्सव, छठ पूजा/सूर्य षष्ठी दला छठ (प्राथ अर्घ्य), इगास-बागवाल, सेंग कुट. स्नेम, गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा रहस पौर्णिमा आणि कनकदास जयंती.

भारतात, सर्व शेड्युल्ड आणि नॉन शेड्यूल्ड बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सार्वजनिक सुटी पाळतात.

Follow Us
जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक
Shivsena : जालन्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंठा-परतूरमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?
भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान...
Rohit Pawar : भाजपसोबत जाणारे पक्ष येत्या काळात संपणार; रोहित पवारांचं मोठं विधान, एकनाथ शिंदेंनाही दिला सूचक इशारा
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...