Hardik Patel : ‘हार्दिक’ स्वागत ! येत्या 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार; हार्दिक पटेल यांची घोषणा

| Updated on: May 31, 2022 | 12:23 PM

Hardik Patel : हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य नेतृत्वाला वैतागून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांना भलं मोठं पत्रं लिहिलं होतं.

Hardik Patel : हार्दिक स्वागत ! येत्या 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार; हार्दिक पटेल यांची घोषणा
हार्दिक पटेलचा भाजप प्रवेश!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हार्दिक पटेल  (Hardik Patel) हे कोणत्या पक्षात जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच हार्दिक यांनी स्वत:चं त्याबाबतची घोषणा केली आहे. येत्या 2 जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा हार्दिक पटेल यांनी केली आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पटेल यांच्यामुळे मोठा फायदा होणार असून काँग्रेसला (Congress) मात्र मोठा फटका बसणार असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील पाटीदार समाजाचं हार्दिक पटेल नेतृत्व करतात. या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यामुळे हा समाज भाजपच्या दिशेने वळणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हार्दिक पटेल यांना भाजपमध्ये काय जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शिवाय पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित प्रवेश करणार की राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थित प्रवेश करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच राज्य नेतृत्वाला वैतागून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांना भलं मोठं पत्रं लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी राज्य नेतृत्वावर टीका करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. तसेच काँग्रेस नेत्यांकडून गुजराती लोकांचा कसा अपमान केला जात आहे. गुजराती लोकांची अस्मितेला ठेच पोहोचवण्याचं काम कसं केलं जात आहे यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे गुजरात निवडणुकीत गुजराती अस्मितेचाच मुद्दा अधिक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

पटेल नेमकं काय म्हणाले होते?

हार्दिक पटेल यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात मनातील खदखद व्यक्त करतानाच गुजराती अस्मितेचा मुद्दाही उपस्थित केला होता. काँग्रेस आता देश आणि समाजहिताच्या विपरीत काम करत आहे. काँग्रेसने फक्त विरोधाचं राजकारण करण्यापलिकडे काहीच केलं नाही. राम मंदिर, सीएए एनआरसी, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि जीएसटी लागू करणे आदी मुद्द्यांना काँग्रेसने विनाकारण विरोध केला आहे. जेव्हा देश संकटात सापडला, काँग्रेस नेते मात्र विदेशात होते, अशी टीका पटेल यांनी केली होती.

राज्य नेतृत्वावर टीका

गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघा महिना बाकी असतानाच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मला काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवलं. पण कोणतीच जबाबदारी दिली नाही. मला सातत्याने डावललं गेलं. मी काँग्रेस सोडावी असंच राज्यातील नेतृत्वाला वाटत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. राज्यात काँग्रेस अत्यंत कमकुवत आहे. तसेच काँग्रेस जिंकेल अशी स्थिती नाहीये, असं सांगत त्यांनी राजीनामा दिला. तसेच राज्यातील नेतृत्व तरुणांना संधीच देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.