काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सरन्याशांनी अचानक भेट का नाकारली? अचानक काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

सरन्यायाधीस सूर्यकांत यांनी वेळ दिली होती. परंतु अचानक भेट नाकारली. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सरन्याशांनी अचानक भेट का नाकारली? अचानक काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
harshwardhan sapkal
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 12, 2026 | 10:06 AM

इंडिया आघाडीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंडिया आघाडी आज सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढणार आहे. मोर्चानंतर काँग्रेसचे शिष्टमंडळ सरन्याधीशांची भेट घेणार होते. परंतु ऐनवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेट नाकारली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘ दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलन सुरू आहे. आमचे गाव, शहर, जिल्हा पातळीवर आंदोलन होत असतात. तसेच राज्यपातळीवर आंदोलन झाली आहेत. राहुल गांधी यांना सलग दोन दिवस पोलीस,  सरकारच्या वर्तवणुकीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मागील गुरुवारी काळा दिवस पाळला. खरंतर मोठ्या प्रमाणात हा दिवस पाळला. कोण करतंय, यापेक्षा सर्वांची जबाबदारी आहे. हे आंदोलन मतांचं नाही. हे राजकारणाचं नाही. संविधान वाचवण्याचे आंदोलन आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन आहे. निवडणुका पारदर्शक करण्यासाठी आंदोलन होत आहेत’.

Loading...

‘मतचोरी झाली, त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक झाली पाहिजे. हा गुन्हा देशद्रोहात मोडतो. त्यामुळे देशद्रोहाचा खटला त्यांच्यावर चालवावा. त्यांना तात्काळ अटक करावी. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन सुरू आहे. सरकार आता हुकूमशाहीपद्धतीने कसं वागतात, यावर पुढची भूमिका ठरेल.  न्यायालयाने सायंकाळी चार ते पाच  ही वेळ दिली. त्यानंतर  वेळ नाकारली आहे. यामध्ये काय गौडबंगाल आहे. हे देशासमोर आलं पाहिजे. देशात लोकशाही वाचवण्यासाठी लोक पुढे आलेत. त्यानंतर भाजप लोकांमध्ये जातीयवाद निर्माण करत आहे. त्यातून नागरिकांची एकता बाधित करण्याचं काम सुरू आहे, असे सपकाळ पुढे म्हणाले.

‘एसआयआर नव्हे, ईव्हीएमच्या घोळाप्रकरणी ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाही, तोपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. दूध का दूध पाणी झालं आहे. गल्ली गल्ली मे शोर है, चौकीदार चोर है, हा नारा लोकांपर्यंत पोहोचला आहे. मतदान प्रक्रिया, ईव्हीएमवर संशय असेल, तर अत्यंत गंभीर आहे. याला सर्वांनी मिळून पुढे घेऊन गेलं पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us