सुप्रीम कोर्टात आज ठाकरेंची शिवसेना पक्ष मांडणार, पक्ष चिन्ह ठाकरेंकडे की शिंदेंकडे? सर्वांच्या नजरा..

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी आहे. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाकडून कोर्टात कपिल सिब्बल बाजू मांडतील. अपात्रतेवर त्यांनी जोरदार युक्तीवाद मागच्या सुनावणीत केला होता.

सुप्रीम कोर्टात आज ठाकरेंची शिवसेना पक्ष मांडणार, पक्ष चिन्ह ठाकरेंकडे की शिंदेंकडे? सर्वांच्या नजरा..
Eknath Shinde and Uddhav Thackeray
| Updated on: Aug 18, 2026 | 7:40 AM

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी आहे. दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला. कपिल सिब्बल यांनी अपात्रता आणि पक्ष चिन्ह यावर अधिक जोर दिला. युक्तिवादावेळी जनता दल, समाजवादी पार्टी यांचेही संदर्भ देण्यात आली. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी कसे निर्णय दिले, याबाबतही सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यासोबतच निवडणूक आयोगाने आपल्या कक्षाबाहेर जात काही निर्णय शिंदेंच्या बाजूंनी घेतल्याचेही त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगावर त्यांनी ताशेरे ओढले. आजच्या सुनावणीत सुरूवातीला ठाकरेंकडून कपिल सिब्बल युक्तीवाद सुरू करतील.

सुप्रीम कोर्टात आज पुन्हा कपिल सिब्बल युक्तीवादाला सुरूवात करतील. पक्ष चिन्हावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला दावा खोडण्याचे मोठे आव्हान शिंदेंच्या शिवसेनेकडे असेल. कारण कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना संघटनात्मक नियम आणि संघटना कोणाच्या बाजूने आहे, हे सांगितले. पक्षाच्या घटनेत कधी बदल झाला हे देखील त्यांनी सांगितले. सर्व अधिकार अध्यक्ष ठाकरेंकडेच असल्याचेही त्यांनी म्हटले.

राजकीय पक्षात फूट पडली तर तो पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचे याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे असतो. शिवसेनेच्या प्रकरणी विधिमंडळात पडलेली फूट ही राजकीय पक्षातील फूट समजली गेली. त्या आधारे निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला, असा युक्तीवाद अगोदरच कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला. शिवसेना शिंदे गटाकडून नीरज किशन कौल, मनिंनदर सिंह बाजू मांडतील.

कपिल सिब्बल आजही जोरदार युक्तीवाद करणार आहेत. मागच्या सुनावणीमध्ये त्यांनी कोर्टाला त्यांच्याकडे असलेले काही कागदपत्रे घेण्यास विनंती केली होती. यासोबतच निवडणूक आयोगात दाखल केलेल्या कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडून मिळालेली पोहोच पावतीही त्यांनी कोर्टात दाखवली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ गटात फूट पडली होती, ती राजकीय पक्षात नव्हती, असाही युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. आजच्या या सुनावणीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us