Video: धोकादायक! झोपी गेले आणि पुरानं वेढले, एका एकाला दोरीनं काढले, पाहा व्हिडीओत काय काय घडले?

| Updated on: Jun 11, 2021 | 10:56 AM

सागर जिल्ह्यातल्या रहली क्षेत्रात एका पूल बनवला जातो आहे. गेल्या काही काळापासून इथं जोरदार पाऊस पडतो आहे. गुरुवारी रात्री काही मजुर पुलाचं काम करुन पुलाच्याच पिलरवर झोपी गेले. | Rain in MP

Video: धोकादायक! झोपी गेले आणि पुरानं वेढले, एका एकाला दोरीनं काढले, पाहा व्हिडीओत काय काय घडले?
Follow us on

भोपाळ: महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे पण मध्य प्रदेशात (Madhya Pradesh Rain) अजूनही मान्सूनपुर्व (Pre monsoon rain)पाऊसच जोरदार पडतो आहे. मान्सूनपुर्व असल्यामुळे तो कधी येईल आणि रौद्र रुप धारण करेल ते सांगता येत नाही. मान्सूनच्या पावसाबद्दलही ते सांगता येत नाही. मध्यप्रदेशातल्या भोपाळ, (Bhopal) सागर (Sagar) जिल्ह्यातही असाच तुफान पाऊस पडला आणि बांधल्या जात असलेल्या पुलाच्या खांब्यावर झोपलेल्यांना रात्रीतून पुरानं वेढलं. (Heavy rain caused floods in Sunar river in sagar rescue the trapped labourer on the Piller)

नेमकं काय घडलं?

सागर जिल्ह्यातल्या रहली क्षेत्रात एका पूल बनवला जातो आहे. गेल्या काही काळापासून इथं जोरदार पाऊस पडतो आहे. गुरुवारी रात्री काही मजुर पुलाचं काम करुन पुलाच्याच पिलरवर झोपी गेले. रात्रीतून सागर जिल्ह्यात एवढा पाऊस झाला की सुनार नदीला (Sunar River) मोठा पूर आला. मजूर सकाळी उठले तर ते पुराच्या पाण्यानं वेढले गेले होते. पुराच्या पाण्याचा स्तर कमी होण्याऐवजी वाढतच होता.

मजूर घाबरुन गेले. मग आजुबाजुच्या लोकांनाही ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी दोरीची सोय केली. प्रशासनालाही कळवलं गेलं. मग दोरीच्या मदतीनं एका एका मजुराला पुराच्या जबड्यातून बाहेर काढलं गेलं. फक्त रहली क्षेत्रातच नाही तर सागर जिल्ह्यातल्याच गडाकोटा भागातही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. इथेही सुनार नदीला आलेल्या पुरामुळे एका जागेवर काही लेकरं अडकून पडली होती. त्यांनाही सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं आहे.


(Heavy rain caused floods in Sunar river in sagar rescue the trapped labourer on the Piller)