IRCTC च्या नव्या बिटा वेबसाईटने तात्काळ तिकीट होणार झटपट बुक, ही दोन कामे आधी करा…
IRCTC च्या नव्या बिटा वेबसाईटमध्ये युजर इंटरफेसला फ्रेंडली बनवण्यासह सुरक्षित बनवण्यात आले आहे. नवीन वेबसाईटमध्ये तात्काळ तिकीट बुक करण्याच्या आधी तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत.

IRCTC ने अलिकडेच आपल्या नव्या वेबसाईटचे बिटा व्हर्जन लाँच केले आहे. या नवीन वेबसाईटचे डिझाईन पासून ते फिचर्सपर्यंत सर्व अपडेट केले आहे. भारतीय रेल्वेच्या नवीन वेबसाईटला टेस्टींगसाठी लाँच केले आहे. याद्वारे तुम्ही रेग्युलरसोबत तिकीटांसोबत तत्काळ तिकीट बुक करु शकतात. जर, तुम्ही पहिल्यांदा या नव्या वेबसाईटमध्ये लॉग इन केले तर तुम्हाला आधी काही व्हेरिफीकेश प्रक्रिया करावी लागेल. यानंतर तुम्ही सह तिकीट बुक करु शकणार आहे.
आयआरसीटीसीच्या नवीन वेबसाईटला युजर फ्रेंडली बनवण्यासाठी यात अनेक सेक्शनला एकसाथ इंटिग्रेट केले आहे. म्हणजे युजर्सना एकाच जागी सर्व माहिती मिळणार आहे. या नव्या बिटा वेबसाईटमध्ये युजर्स सहजपणे नेव्हीगेशन करु शकणार आहेत.या वेबसाईटची सायबर सुरक्षा देखील चांगली करण्यात आली आहे.
सर्वात आधी हे काम करावे –
पहिल्यांदा आयआरसीटीसीच्या नव्या बिटा वेबसाईटमध्ये लॉग-इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल एड्रेस आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागेल. विना व्हेरिफिकेशन तुम्ही नव्या वेबसाईटवरुन कोणतेही तिकीट बुक करु शकणार नाही. एकदा व्हेरिफिकेशन केल्यानंतर या नवीन वेबसाईटला तुम्ही एक्सेस करु शकणार आहे.
यासाठी तुम्हाला लॉग ईन केल्यानंतर राईट साईडमध्ये दिलेल्या युजर आयडीवाल्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
येथे My Profile मध्ये जाऊन Authenticate Use वाल्या ऑप्शनवर क्लिक करावे.
जर तुमचे आधारकार्ड व्हेरिफाईड वा लिंक्ड असाल तर येथे दिसेल..
अन्यथा तुम्हाला तुमच्या आधारकार्डचे डिटेल्स नोंदवून ऑथेंटिकेट करावे लागेल.
तात्काळ तिकीटासाठी आधार ऑथेंटिकेशन करणे गरजेचे
भारतीय रेल्वेच्या नव्या नियमाच्या मते, विना आधार ऑथेंटिकेटच्या तुम्ही तुमच्या IRCTC अकाऊंटने तात्काळ तिकीट बुक करु शकणार नाही. जर, तुमच्या अकाऊंटच्या सोबत आधारकार्ड लिंक आहे आणि तुम्ही आधीच यास ऑथेंटिक केले आहे. तर तुम्ही सहजपणे तात्काळ तिकीट बुक करु शकतो.
जर तुम्ही तुमच्या अकाऊंटसोबत आधारला ऑथेंटिकेट केलेले नाही तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन यास ऑथेंटिकेट करु शकाल.
नवीन वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी लॉग-इन करावे लागेल.
त्यानंतर उजव्या बाजूला वर दिलेल्या User ID वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर माय प्रोफाईलवर गेल्यानंतर ऑथेंटिकेट युजरवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या आधारकार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP रिसिव्ह होईल.
त्यानंतर तुम्ही नवीन वेबसाईटवरुन तात्काळ तिकीट बुक करु शकता