Hill Station : सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर

Solo Travel: तुम्ही एकट्याने फिरण्याचा प्लान करत असाल तर हिरवे डोंगर आणि धबधबे नक्कीच तुम्हाला पसंद पडतील. येथील शांत निसर्गात तुमचा स्वत:शीच स्वत:चा संवाद घडेल...

Hill Station : सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
Solo Travel
| Updated on: Sep 27, 2026 | 4:23 PM

Best Hill Stations for Solo Travel: सोलो ट्रीपची वेगळीच मजा असतो. सोलो ट्रीपमध्ये आपण आपल्या मर्जीनुसार जागांना एक्सप्लोर करत असतो आणि कोणतीही घाई न करता निसर्गाचा आनंद लुटता येत असतो. पर्वत आणि डोंगर रांगात एकट्याने पर्यटन केल्याने मनाला वेगळीच शांती मिळत असते. भारतात असे अनेक पर्वतमय पर्यटन स्थळे आहेत. जेथे झरे, धबधबे, हिरवेगार डोंगर, घनदाट जंगल, ट्रेकिंग ट्रेल्स आणि शानदार पर्वतरांगा पाहायला मिळत आहेत. जर तुम्हीही सोलो ट्रॅव्हलचा प्लान करत असाल तर या 5 जागांना आपल्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये समाविष्ट कराच..

मॅकलोडगंज (हिमाचल प्रदेश) –

मॅकलोडगंज निसर्गसौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील भागसूनाग वॉटरफॉल सोलो ट्रॅव्हलर्स आणि बॅकपॅकर्समध्ये खूप पसंद केला जात आहे. हा भारताच्या सर्वात मोठ्या धबधब्यात भलेही सामील नसेल परंतू आजूबाजूचा शांत परिसर आणि नैसर्गिक सौदर्य यास खास बनवतो.

येथे तुम्ही धबधब्याच्या जवळ फिरु शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता वा काही क्षण शांतपणे स्वत:च्या मनाशी संवाद साधू शकता. मॅकलोडगंजला जाण्यासाठी जवळचा एअरपोर्ट गग्गल आहे. कांगडा आणि नगरोटा जवळचे रेल्वे स्थानक आहे. येथे फिरण्यासाठी जून ते सप्टेंबरची वेळ चांगली आहे.

शिलाँग (मेघालय) –

मेघालयाच्या राजधानी शिलाँगला ‘स्कॉटलँड ऑफ दि ईस्ट’ देखील म्हटले जाते. ही जागा येथील हिरवा निसर्ग, पर्वत आणि सुंदर धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील एलिफंट फॉल्स प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे, हे शहरापासून १२ किमी दूर आहे.

मान्सूनमध्ये येथे धबधब्याचे सौदर्य आणखी वाढते. येथे एकटे फिरताना तुम्ही निसर्गात वेळ घालवू शकता आणि सुंदर फोटो काढू शकता शिलाँग फिरण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा वेळ चांगला मानला जातो.

कसोल (हिमाचल प्रदेश) –

जर तुम्हाला ट्रेकिंग पसंद असेल तर कसोल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. येथे अनेक सुंदर ट्रेक सुरु होतात. खीरगंगा ट्रेकच्या मार्गे रुद्रनाग वॉटरफॉल देखील पाहायला मिळू शकतो. धबधबे आणि पर्वतात फिरत ट्रेकिंगचा अनुभव घेणे खास असतो. सोलो ट्रॅव्हलर्स येथे निसर्गाचा आनंद घेण्यासह ट्रेकिंगचा मजा देखील घेऊ शकतात. कसोल येथे फिरण्यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरची वेळ चांगली म्हटली जाते.

जोग फॉल्स (कर्नाटक) –

कर्नाटकचा जोग फॉल्स देशाच्या प्रमुख धबधब्यांपैकी एक आहे. येथे हिरवेगार जंगला पाहायला मिळते. मान्सून दरम्यान येथील सौदर्य पाहाण्यासारखे असते.

सोलो ट्रॅव्हलर्स येथे आजूबाजूच्या सौदर्याचा आनंद लुटू शकता आणि ट्रेकिंग देखील करु शकता. वॉटकिंस प्लॅटफॉर्मने धबधब्यांचा शानदार नजारा पाहाता येतो. येथे फिरण्यासाठी जून ते सप्टेंबरचा वेळ चांगला आहे.

तवांग (अरुणाचल प्रदेश) –

जर तुम्ही गर्दीपासून दूर शांत आणि सुंदर पर्वतांचा प्रदेश शोधत असाल तर तवांगला जाऊ शकता. येथील नूरानांग फॉल्स, ज्यास बोंग बोंग फॉल्स देखील म्हटले जाते, जो खूपच सुंदर आहे.

चारी बाजूंना पर्वत, हिरवाई आणि धबधब्याचे फेसाळते पाणी या जागेला खास बनवते. येथे आरामात शांतता अनुभवता येते. अरुणाचल प्रदेशच्या प्रवासासाठी इनर लाईन परमिटची (ILP) गरज लागते. त्यामुळे आवश्यक परमिट आणि नियम यांची माहिती प्रवासाआधी नीट घ्यावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us