
इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि 28 फेब्रुवारी रोजी मध्य पूर्वेत एका भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिकेनं त्यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केली होती. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर इराण जेवढ्यावेळेस नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करेल तेवढ्यावेळेस आम्ही त्याला मारू अशी धमकी इस्त्रायलकडून इराणला देण्यात आली होती. मात्र इराणने पुन्हा एकदा आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली. आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोजतबा खामेनेई हे देखील अमेरिका आणि इराणच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मोठा दावा केला आहे, इरानचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हे युद्धात जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा चेहरादेखील पूर्णपणे खराब झाल्याची शक्यता आहे, असं हेगसेथ यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनेई सध्या अशा अवस्थेमध्ये आहेत की ते आता त्यांच्या देशाचं नेतृत्व देखील करू शकणार नाहीत, इराणचं नेतृत्व भित्र आहे. लपून बसलं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आणि त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा एकही फोटो किंवा व्हिडीओ समोर आला नसल्याचे पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या घटनेचा पुरावा देताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्याकडून पहिली प्रतिक्रिया गुरुवारी आली होती, मात्र ही प्रतिक्रिया थेट त्यांचा व्हिडीओ किंवा आवाजामध्ये नव्हती. तर त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं, ते एका न्यूज अँकरने वाचून दाखवलं. जर खामेनेई हे चांगल्या स्थितीमध्ये असते तर त्यांनी स्वत: जगसमोर येऊन स्टेटमेंट दिलं असतं असंही यावेळी अमरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मोजतबा खामेनेई यांनी आपल्या संदेशात म्हटलं होतं की, होर्मूज स्ट्रेट हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल या ठिकाणावरून आम्ही एकही जहाज जाऊ देणार नाही, तसेच इराणच्या शेजारी जे देश आहेत, त्यांनी अमेरिकेचे सैन्यतळं आपल्या देशातून काढून टाकावेत. दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेकडून मात्र मोठा दावा करण्यात आला आहे. मोजतबा खामेनेई हे युद्धात जखमी झाल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.