AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा मास्टस्ट्रोक, अमेरिका इस्त्रायलला आतापर्यंताच सर्वात मोठा धक्का, ट्रम्प, नेतन्याहूंना फुटला घाम, जगभरात मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या 15 दिवसांपासून इस्त्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत मोठं नुकसान झाला आहे. मात्र त्यानंतर आता या युद्धात मोठा उलटफेर पहायला मिळत आहे.

इराणचा मास्टस्ट्रोक, अमेरिका इस्त्रायलला आतापर्यंताच सर्वात मोठा धक्का, ट्रम्प, नेतन्याहूंना फुटला घाम, जगभरात मोठी खळबळ
Iran Israel War Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 14, 2026 | 3:23 PM
Share

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज या युद्धाचा 15 वा दिवस आहे. या युद्धात आता इराण वरचढ ठरताना दिसत आहे. कारण इराणच्या मिसाईल हल्ल्यानं अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यानं इस्त्रायलमध्ये धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे इराणने आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैन्यतळांवर देखील एवढे अचूक हल्ले केले आहेत की त्यामुळे अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेचे अनेक सैनिक या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. त्यानंतर अमेरिकेकडून रशियावर गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत, रशियाने आमच्या सैन्य तळांच्या लोकेशनची गुप्त माहिती इराणला पुरवल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. मात्र रशियाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान आता इराणने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. इराणच्या नव्या युद्धच्या रणनीतीमुळे अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फुटला आहे.

इराणकडून आता या लढाईमध्ये नवं शस्त्र वापरण्यास सुरुवात झाली आहे. ज्याचं नाव ‘359’ असं आहे. हे एक जमिनीच्या पुष्ठभागावरून हवेत मारा करणारं खतरनाक मिसाईल आहे. ‘359’ हे ‘358’ मिसाईलचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. या मिसाईलचं वैशिष्ट म्हणजे याला रडारची आवश्यकता नाहीये, रडारचा वापर न करताही शत्रू राष्ट्रांच्या ड्रोनला सापडून ते नष्ट करण्याची ताकद या मिसाईलमध्ये आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये इराणच्या ‘358’या मिसाईलने अनेक अमेरिकेच्या MQ-9 रीपर आणि इस्त्रायलच्या हर्मीस 900 ड्रोनला पाडलं आहे. या मिसाईलची अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये प्रचंड दहशत आहे.

या मिसाईल हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इस्त्रायलच्या नाकीनऊ आले आहेत. त्यानंतर आता इराणने ‘359’ हे आपलं स्पेशल मिसाईल युद्धात उतरवलं असून, याचा कोणताही तोड सध्या तरी अमेरिका आणि इस्त्रायलकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. या मिसाइलचं वैशिष्ट म्हणजे याला रडारची आवश्यकता नाहीये, हे मिसाईल ट्रकमधून लाँच केलं जाऊ शकतं, त्यानंतर ते हवेत फिरत राहतं आणि स्व:ताहून लक्ष्याचा शोध घेऊन लक्ष्य नष्ट करतं, या मिसाईलचा वेग प्रति तास 740 किमी एवढा आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल