80 वर्षांची महिला जिचा जन्म 1920 ला झाला, अन् मृत्यूही 1920 मध्येच झाला हे कसं? भल्याभल्यांना नाही जमणार उत्तर

असे अनेक प्रश्न असतात ज्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, मात्र बराच प्रयत्न करून देखील त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही, असेच काही प्रश्न आपल्याला मुलाखतीच्या वेळी देखील विचारले जातात.

80 वर्षांची महिला जिचा जन्म 1920 ला झाला, अन् मृत्यूही 1920 मध्येच झाला हे कसं? भल्याभल्यांना नाही जमणार उत्तर
Knowledge News
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 14, 2025 | 9:57 PM

जनरल नॉलेज हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी मुलाखतीसाठी जातो तेव्हा आपल्याला अनेकदा जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न आपण जे आतापर्यंत शिक्षण घेत आलो आहोत, त्यावरच सामान्यपणे आधारीत असतात, जसं की जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? असे अनेक प्रश्न कधी-कधी आपल्याला मुलाखतीदरम्यान विचारले जातात.  जर आपल्याला या प्रश्नांची उत्तर माहिती असतील तर आपण ज्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलो आहोत, त्या ठिकाणी आणि आपली मुलाखत जो व्यक्ती घेतो आहे, त्याच्यावर चांगला प्रभाव पडतो.  जर या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहिती असतील तर ती नोकरी आपल्यालाच मिळण्याची जास्त शक्यता असते.

आजकाल तर अनेक ठिकाणी नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञान हा एक वेगळाच राऊंड असतो. यामधून तुमचं सामान्य ज्ञान चेक केलं जातं, तर असे देखील काही प्रश्न असतात सामान्यपणे हे प्रश्न जनर नॉलेज कॅटेगिरीमध्येच येतात, परंतु त्यामधून तुमचा हजरजबाबीपणा चेक केला जातो, तुमची आकलन क्षमता चेक केली जाते. सामान्यपणे असे प्रश्न हे एखाद्या सरकारी नोकरीसाठी तुम्ही जेव्हा मुलाखत देण्यासाठी जाता तेव्हा विचारले जातात. मात्र काही ठिकाणी खासगी नोकरीसाठी मुलाखत देताना देखील असे प्रश्न विचारले जातात. असाच एका मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर अनेकांना आलं नाही.

तर प्रश्न असा होता की एक वृद्ध महिला आहे, जिचं वय मृत्यूच्यावेळी 80 वर्ष होतं. जिचा जन्म 1920 साली झाला होता, आणि तिचा मृत्यूही 1920 मध्येच झाला हे कसं शक्य आहे? अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही जमलं नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असं होतं की या महिलेचा जन्म हा 1920 सालीच झाला होता, तिचा मृत्यू देखील ती 80 वर्षांची असताना झाला, मात्र या महिलेचा मृत्यू जिथे झाला त्या हॉस्पिटलच्या रुमचा नंबर हा  1920 होता. याचाच अर्थ ही महिलेचा 1920 ला जन्म झाला होता आणि तिचा मृत्यू हा 1920 नंबरच्या वार्डमध्ये झाला.