इस्त्रायलच्या विमानाला दहशतवादी हल्ल्यामधून वाचवणाऱ्या पायलट स्मित मच्छार यांचा पगार आहे तरी किती? आकडा ऐकून बसेल धक्का
स्मित मच्छार यांचं आज संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे. त्यांनी मोठ्या हिमतीने विमानातील 174 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. हल्ला झाल्यानंतर देखील त्यांनी सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

सध्या संपूर्ण जगभरात जर कोणाची चर्चा सुरू असेल तर ती म्हणजे भारताचा पायलट स्मित मच्छार यांची, संपूर्ण जग आज स्मित मच्छार यांच्या हिंमतीचं कौतुक करत आहे. त्यांनी दुबईवरून तेल अवीव येथे जाणारं विमान फ्लाय दुबईमध्ये असलेल्या 174 प्रवाशांचा जीव वाचवला आहे. कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर त्यांचाच सहकारी असलेल्या ओमानी पायलटकडून कॉकपिटमध्ये चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये स्मित मच्छार हे गंभीर जखमी झाले, परंतु तरी देखील ते हिंमत हारले नाहीत, त्यांनी तशाही अवस्थेमध्ये या पायलटचा सामना केला. मदत मागितली आणि कॉकपीटचा दरवाजा उघडला, त्यामुळे विमानामधील प्रवाशांनी या हल्लेखोर पायलटला ताब्यात घेतलं. या सर्व झटापटीमध्ये विमान तब्बल 33 हजार फुटांवरून 17 हजार फुटांपर्यंत खाली आलं होतं. मात्र स्मित मच्छार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आणि 174 प्रवाशांचा जीव वाचला. त्यांच्या या धाडसाचं जगभरात कौतुक होत आहे.
पायलट स्मित मच्छार हे दुबईच्या फ्लाय दुबई एअरलाईन्समध्ये काम करतात. ही कंपनी संयुक्त अरब अमिरात (UAE) ची सरकारी कंपनी आहे. इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ दुबई ही फ्लाय दुबई या कंपनीची पॅरंट कंपनी आहे. महामहिम शेख अहमद बिन सईद अल मकतूम हे या कंपनीचे चेअरमन आहेत. एवढा मोठा हल्ला होऊन देखील 174 प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या स्मित मच्छार यांना ही कंपनी नेमका किती पगार देते? त्यांना काय -काय सुविधा दिल्या जातात हे जाणून घेऊयात.
फ्लाय दुबई एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या स्मित मच्छार यांना कंपनी नेमका किती पगार देते याचा आकडा समोर आलेला नाही, परंतु ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या ठरलेल्या स्ट्रकक्चर प्रमाणे पगार देते. यावरून आपल्याला त्यांच्या सॅलरीचा अंदाज लावता येऊ शकतो. मिडिया रिपोर्टनुसार फ्लाय दुबई ही कंपनी स्मित मच्छार सारख्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला 50,235 दिरहम एवढी सॅलरी देते. तसेच ओव्हर टाईमसाठी पायलटला 16,310 दिरहम जादा वेतन दिलं जातं, भारतीय रुपयात हा पगार सांगायचा झाल्यास स्मित मच्छार यांचा एकूण पगार दर महिन्याला तब्बल 17,39,108 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीच्या वतीने त्यांना विविध सुविधा देखील दिल्या जातात.
