AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिल्या निवडणुकीस किती आला होता खर्च, आता किती होणार….

lok sabha election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. यामधील 20% खर्च निवडणूक आयोग करणार आहे. इतर खर्च राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांचा असणार आहे. या खर्चात सरकारला 80 कोटी लोकांना आठ महिने मोफत राशन वाटता आले असते.

देशातील पहिल्या निवडणुकीस किती आला होता खर्च, आता किती होणार....
lok sabha election schedule 2024Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 31, 2024 | 10:01 AM
Share

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. ही निवडणूक जगातील सर्वात महाग निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत हजारो कोटी रुपये खर्च येत आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या देशातील पहिल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने दहा कोटी रुपये खर्च केले होते. आता त्यात मोठी वाढ झाली आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अंदाजानुसार लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. हा अंदाज बरोबर असल्यास ही जगातील सर्वात महाग निवडणूक ठरणार आहे.

कसा होतो खर्च

दर पाच वर्षांनी निवडणूक खर्च दुप्पट होत आहे. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण सर्व 60 हजार कोटी रुपये खर्च झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 30 हजार कोटी रुपये खर्च झाला होता. लोकसभा निवडणुकीचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या खात्यातून होतो. विधानसभा निवडणुकीचा खर्च राज्य सरकारकडून केला जातो. दोन्ही निवडणुका बरोबर झाल्यास राज्य आणि केंद्र यांच्यात खर्चाची विभागणी केली जाते.

असा होत गेला खर्च (फक्त निवडणूक आयोगाचा खर्च)

  • पहिला सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये झाली. त्याला 10.45 कोटी रुपये खर्च झाला.
  • 2004 मध्ये प्रथमच निवडणूक खर्च हजार कोटींचा वर गेला. त्यावेळी 1,016 कोटी खर्च झाले होते.
  • 2009 मध्ये 1,115 कोटी खर्च झाले.
  • 2014 मध्ये 3,870 कोटी रुपये खर्च झाले होते.
  • 2019 मधील निवडणुकीचा खर्च अद्याप जाहीर झाला नाही. तो पाच हजार कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

यंदा किती होणार खर्च

2024 मधील लोकसभा निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. यामधील 20% खर्च निवडणूक आयोग करणार आहे. इतर खर्च राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांचा असणार आहे. या खर्चात सरकारला 80 कोटी लोकांना आठ महिने मोफत राशन वाटता आले असते. केंद्र सरकारकडून सध्या गरीबांना मोफत धान्य वितरण केले जाते. त्याचा तीन महिन्यांचा खर्च 46 हजार कोटी रुपये आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी 1,500 कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च केले होते. त्यात सात राष्ट्रीय पक्षांचा खर्च 1,223 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रसिद्धीवर सर्वाधिक खर्च भाजप आणि काँग्रेसने केला आहे. भाजपने 650 कोटी तर काँग्रेसने 476 कोटी खर्च केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.