
भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवरुन तिकीटांची बुकींग सोपी आहे. परंतू या सदंर्भात आपल्याला संपूर्ण माहीती असणे गरजेचे आहे.कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला अनेक प्रकारे नुकसान पोहचवू शकते. भारतीय रेल्वेच्या ॲपवरुन तिकीट बुकींग संदर्भात अनेक माहीती दिली आहे. जर तुम्ही तिकीट बुकींग करताना नीट काळजी घेतली नाही तर तुम्हाला नाहक अधिक चार्जेस भरावे लागू शकतात. आज आपण या लेखात पाहूयात IRCTC ॲपवरुन रेल्वेची तिकीट कशी बुक करायची ते…
IRCTC च्या ॲपवरुन रेल्वेची तिकीट बुक करताना आपल्याला तिकीटाचा हँडलिंग चार्ज आणि जीएसटी देखील भरावा लागू शकतो. भलेही रक्कम खूपच छोटी असेल तर ती तुम्हाला भरावी लागते. भारतीय रेल्वेचे अप तुम्ही पासवर्ड शिवाय उघडू शकत नाही. यासाठी तुम्हाला आयडी आणि पासवर्ड संदर्भात माहीती असायला हवे.
जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर त्यास रिसेट करु शकता. यास रिसेट करताना कॅप्चा योग्य प्रकारे भरा. नाहीतर अनेकदा लॉगिन करताना नाना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यात डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वा IRCTC Wallet सारखे ऑप्शन आहेत.
IRCTC च्या ॲपवरुन तिकीट बुक करताना ‘तात्काळ’ तिकीटाचा पर्याय असतो. अचानक महत्वाचा प्रवास करायचा असेल तर जादा रक्कम भरुन आदल्या दिवशी तिकीट बुक करता येते. या तिकीट मर्यादित असतात. या तुम्ही ॲप आधीच ओपन करुन ठेवावे. ‘तात्काळ’ तिकीट बुक करताना आधी ॲप ओपन केल्याने ॲप ओपन करण्याचा वेळ वाचतो. त्यामुळे तात्काळ तिकीट बुकींग करण्यात उशीर होतो.
तुम्ही तिकीट बुक करताना वेटिंग आणि कन्फर्म सीटची देखील काळजी घ्यावी. जर ट्रेनचे कन्फर्म सीट मिळत आहे तर त्याच ट्रेनचे तिकीट बुक करावे. ज्या ट्रेनच्या वेटिंगची संख्या कमी असते त्यातच बुकिंग करावे. वेटिंगचे तिकीट WL5, WL6 आणि WL12 या सारखे लिहीलेले असते.
जर तुमच्या सोबत सिनियर सिटीझन प्रवास करीत असतील तर तुम्ही सीटचे प्रेफरन्सवर सिलेक्ट करावे. कारण तरच तुम्हाला लोअर बर्थ मिळेल. अन्यथा तुम्हाला कोणतीही सीट मिळू शकते. ॲपवरुन तिकीट बुक करताना तुम्ही UPI ने पेमेंट करु शकता. परंतू पेमेंट जर रद्द झाले तर, सर्व डिटेल्स तुम्हाला पुन्हा भरावे लागू शकते. तिकीट रद्द करण्याची सुविधा देखील येथे चांगली आहे.