
परदेशी जाण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर तुम्हाला चलन देवाणघेवाणीशी संबंधित नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही फॉरेक्स कार्डचाही वापर करू शकता. पण, याचवेळी एक गोष्टी लक्ष्यात घ्या की, विमानतळावर चलनाची देवाणघेवाण करणे टाळावे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
प्रत्येक देशाचे चलन वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, भारताचे चलन रुपया आहे, अमेरिकेचे चलन डॉलर आहे. अशावेळी तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात जात असाल तर तुम्हाला करन्सी एक्स्चेंज करावी लागते. इतर कोणत्याही देशाचे चलन कोणत्याही देशात चालत नाही. ज्यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या चलनाच्या बदल्यात दुसऱ्या देशाचे चलन मिळते.
तुम्ही दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत असाल आणि चलनाची देवाणघेवाण करत असाल तर देवाणघेवाण करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून चलन देवाणघेवाणीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
करन्सी एक्स्चेंज सेंटरमध्ये जावे लागेल
तुमचा पैसा दुसऱ्या देशाच्या चलनात रूपांतरित करण्यासाठी तुम्हाला प्रथम चलन केंद्रात जावे लागेल. यासाठी तुम्हाला आरबीआय मान्यताप्राप्त करन्सी एक्स्चेंज सेंटरमध्ये जावे लागेल. बेकायदेशीर किंवा अनधिकृत चलन देवाणघेवाण केंद्रांवर जाणे टाळा. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणचा विनिमय दर तपासायला हवा. जिथे तुम्हाला चांगला चलन देवाणघेवाण दर मिळतो. तेथून तुम्ही तुमचे चलन बदलून घेता.
चलनाची देवाणघेवाण करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
अनेकदा बँका, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि फॉरेक्स एजंट ही चलन बदलण्यासाठी तुमच्याकडून अनेक शुल्क आकारतात. त्यामुळे या छुप्या शुल्कांबद्दल तुम्हाला आधीच माहिती असायला हवी. इतकंच नाही तर विमानतळावर चलनाची देवाणघेवाण करणं टाळावं, कारण तुम्हाला इथे जास्त फी भरावी लागू शकते.
परदेशात चलन देवाणघेवाण पर्याय
परदेशात जाण्यापूर्वी परदेशातील चलन देवाणघेवाणीशी संबंधित नियम आणि केंद्रांची माहिती घेणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही फॉरेक्स कार्डचाही वापर करू शकता. चलनाची देवाणघेवाण करताना पावती घ्यायला विसरू नका.
भारत – रुपया
अमेरीका – डॉलर
यु.के. – पौंड
रशिया – रूबल
चीन- युआन
नेपाळ – रुपया
अफगाणिस्तान – अफगाणी
आयरीश रिपब्लीक – आयरीश पौंड
ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियन डॉलर
र्जॉडन – दिनार
ऑस्ट्रिया – शिलींग
इटली – लिरा
बोटसवाना – रॅंड
कुवेत – दिनार
बांगलादेश – टका
जपान – येन
बेल्जियम – फ्रॅंक
केनिया – शिलींग
बुरुंडी – फ्रॅंक
लिबिया – दिनार
ब्रिटन – पौंड
लेबनॉन – पौंड
बर्मा – कॅट
नेदरलॅंड – गिल्डर
क्युबा – पेसो
मेक्सिको – पेसो
कॅनडा – डॉलर
सायप्रस – पौंड
पाकिस्तान – रुपया
न्यूझीलंड – डॉलर
झेकोस्लाव्हिया – क्रोन
पेरु – सोल
डेन्मार्क – क्लोनर
नायजेरिया – पौंड
फिनलॅंड – मार्क
फिलिपाईन्स – पेसो
इथोपिया – बीर
नॉर्वे – क्लोनर
फ्रान्स – फ्रॅंक
पोलंड – ज्लोटी
घाना – न्युकेडी
पनामा – बल्बोआ
जर्मनी – मार्क
पोर्तुगाल – एस्कुडो
गियान – डॉलर
रुमानिया – लेवू
ग्रीस – ड्रॅक्मा
सॅल्वेडॉर – कॉलन
होंडुरा – लेंपिरा
सौदी अरेबिया – रियाल
सोमालिया – शिलींग
युगोस्लाव्हिया – दिनार
सिंगापुर – डॉलर
आइसलॅंड – क्रोन
स्पेन – पेसेटा
इराक – दिनार
साउथ आफ्रिका – रॅंड
इंडोनेशिया – रुपिया
श्रीलंका – रुपया
इस्त्रायल – शेकेल
सुदान – पौंड
इराण – दिनार
स्वित्झर्लंड – फ्रॅंक
जमैका – डॉलर
स्वीडन – क्रोन
सिरिया – पौंड
टांझानिया – शिलींग
थायलंड – बाहत
टुनीशीया – दिनार
युगांडा – शिलींग
त्रिनिदाद आणि टॉबेगो – डॉलर
टर्की – लिरा
युनायटेड अरब प्रजासत्ताक
व्हिएतनाम – दौग
झांबीया – क्वाच्छा
ब्राझिल – ब्राझिलियन रियाल
मलेशिया- मलायन डॉलर
लाओस- किप
कंबोडिया- पिस्तर
पुर्व तिमोर- डॉलर
इटली- युरो
पेरू- इंका
सिएरा लिओन- लिओन