तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का हे कसं पाहाल?

अनेक चालकांना आपल्या नावावर काही दंड तर जमा नाही ना असा प्रश्न सतावत असतो. त्यासाठी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही घर बसल्या याची माहिती मिळवू शकता.

RTO fine e challan information, तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का हे कसं पाहाल?

मुंबई : नव्या मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) वाहतूक नियम मोडल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत जवळपास दहापट वाढ झाली आहे. त्यानंतर अनेकजण सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे आता ई-चलन सुरू (E Challan) झाल्याने आपण गडबडीत वाहतूक नियम (Traffic Rule) मोडत निघून गेलो तरी आता आपल्या नावावर ई-चलन (E Challan) तयार होते आणि दंडाची नोंद होते. त्यामुळे अनेक चालकांना आपल्या नावावर काही दंड तर जमा नाही ना असा प्रश्न सतावत असतो. त्यासाठी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही घर बसल्या याची माहिती मिळवू शकता.

शासकीय यंत्रणांच्या डिजीटलायजेशनमुळे (Digitization) आता आपल्या अनेक कामांसाठी संबंधित सरकारी कार्यालयाचे चक्कर मारण्याची नामुष्की येत नाही. प्रादेशिक वाहतूक कार्यालय (RTO) देखील अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देत आहे. RTO ची अधिकृत वेबसाईट echallan.parivahan.gov.in वर जाऊन आपल्या वाहनाच्या नावे काही दंड जमा आहे का हे तपासू शकता.

मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास वाहनचालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ई-चलनाचा मेसेज देखील येतो. मात्र, अनेकजणांना असे मेसेज येत नसल्याचंही समोर आले आहे. काही वाहनचालक तर असे आहेत, ज्यांनी कुतुहलासाठी आपल्या नावे काही दंड आहे का हे तपासले. त्यानंतर दंडाची रक्कम पाहून त्यांना धक्का बसला.

अनेकदा वाहनाची नोंद होताना त्यासोबत दिलेल्या कागदपत्रांसह तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट केला जात नाही. त्यामुळे संबंधित विभागाकडून येणारे मेसेज मिळतच नाही. असं होत असेल तर तुमचा मोबाईल क्रमांक उद्ययावत (Update) करणे आवश्यक आहे. तसं केल्यास तुम्हाला वेळच्या वेळी माहिती मिळू शकेल. मोबाईल क्रमांकाची नोंदणी किंवा अद्ययावतीकरण करण्यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी https://parivahan.gov.in/parivahan येथे क्लिक करू शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *