
जोधपुर – जोधपुरच्या कालीबेरी येथील बीएपीएस स्वामिनारायण मंदिराच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव नुकताच संपन्न झाला आहे. २५ सप्टेंबर रोजी मंदिराचे लोकार्पण बीएपीएसचे अध्यक्ष परम पूज्य महंतस्वामी महाराज यांच्या शुभहस्ते वैदीक परंपरेनुसार मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या ऐतिहासिक प्रसंगी देश आणि विदेशातून हजारो संख्येने श्रद्धाळू, संत, स्वयंसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.
हे मंदिर राजस्थानच्या पवित्र भूमीवर परम पूज्य प्रमुखस्वामी महाराज यांच्या एका शुभ संकल्पाचे मूर्त स्वरुप आहे. त्यास परम पूज्य महंतस्वामी महाराज यांनी पूर्ण केले आहे. हे केवळ एक आध्यात्मिक केंद्र नसून भारतीय स्थापत्य कला, अध्यात्म आणि मानवेसेवेचे अद्भूत मिश्रण आहे. आणि तसेच हजारो स्वयंसेवकाच्या नि:स्वार्थ सेवा भाव आणि समर्पणाचे प्रतिक आहे.
या मंदिराची निर्मिती बीएपीएस (बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण) संस्थेने केली आहे. बीएपीएसची स्थापना 1907 मध्ये ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी भगवान श्री स्वामिनारायण द्वारा प्रबोधित वैदिक अक्षरपुरुषोत्तम सिद्धांताच्या आधारावर केली आहे. आज जागतिक स्तरावर समाजसेवा, मानव उत्कर्ष आणि आध्यात्मिक पुनर्जागरण कार्यासाठी प्रसिद्ध आहे.
1700 हून अधिक मंदिर आणि 5025 केंद्र
55,000 समर्पित स्वयंसेवकांचा विशाल गट
भव्य अक्षरधाम मंदिर
1200 हून अधिक सुशिक्षित संत
180 हून अधिक मानवी सेवेच्या विविध प्रवृत्तींचे यशस्वी संचलन
दिल्ली अक्षरधाम मंदिर, अमेरिकेचे रॉबिंसविले अक्षरधाम मंदिर, आबू धाबीचे बीएपीएस हिन्दू मंदिर आणि जोधपुरचे स्वामीनारायण मंदिर – ही मंदिरे केवळ आध्यात्मिक केंद्रच नाहीत तर समाज सेवा आणि मानवी उत्कर्षाची जीवंत केंद्र देखील आहेत.
जोधपुर मंदिराचे भूमीपूजन सुमारे एक दशकांपूर्वी झाले होते. साल २०१४ मध्ये जेव्हा परम पूज्य महंतस्वामी महाराजांनी या स्थानी भेट दिली तेव्हा ही जमीन रेतीची आणि आणि जोधपुरी दगडांची खाण होती. दशकाहून येथे संतांनी सतत भेट देऊन हजारो लोकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा दिली होती आणि जोधपुरात सत्संगाचा विस्तार केला.
पायाभरणी विधी: 2019 सद्गुरु वरिष्ठ संत पूज्य ईश्वरचरनदास स्वामीजी यांच्या सानिध्यात संपन्न
यावेळी राजस्थानचे माजी महापौर रामेश्वर दाधीच, हायकोर्टाचे न्यायमूर्ती विनीत माथुर, बडा रामद्वारा सूरसागरचे महंत रामप्रसादजी महाराज, आणि महापौर घनश्याम ओझा यांच्या सह अनेक मान्यवर हजर होते. या भव्य मंदिराच्या निर्मितीला सात वर्षे लागले, हजारो स्वयंसेवक आणि संताच्या आणि स्थानिक समुदायाच्या लोकांच्या अतुलनीय योगदानातून हे भव्य मंदिर उभे राहीले आहे.
कारागिरांचे योगदान:पिंडवाडा, सागवाडा, भरतपूर, जोधपूर, जयपूर आणि आसपासच्या परिसरातील 500 हून अधिक कारागिरांनी या दिव्य धामाच्या निर्मितीत योगदान दिले. संस्थेने त्यांना निवास, अन्न, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी पुरेशा सुविधा पुरवल्या, तसेच त्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्यास प्रोत्साहित केले.
या मंदिराच्या निर्मितीपासून लोकार्पणाच्या या सेवाकार्यातील अनेक संत आयआयटी, आयआयएम, स्नातक आणि पीएचडी होल्डर आहे.त्यांनी आपले उच्च शिक्षण, उज्ज्वल भविष्य आणि राष्ट्र निर्मितीच्या सेवेला समर्पित केले आहे.
मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी ३५ विविध सेवा विभाग संचालित केले गेले, त्यातून हजारो स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. केवळ जोधपुर आणि राजस्थानच नव्हे कर जयपुर, दिल्ली, राजकोट, पोरबंदर आदी शहरातून नोकरी आणि व्यवसायातून सुट्टी घेऊन त्यांनी सेवा कार्य केले आहे.
उत्सवापूर्वी, जोधपूर सत्संग मंडळाच्या महिला भक्तांनी घरोघरी जाऊन भगवान नीलकंठवर्णीची मूर्ती अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली.त्यांनी सुमारे 2100 घरांना भेट दिली आणि लोकांना मंदिराबद्दल सांगितले आणि तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.मंदिराची स्वच्छता, मंदिराची सजावट आणि दगडांचे कोरिव कामातही महिला स्वयंसेवकांनी आपले अमुल्य योगदान दिले आहे.
मंदिरात महोत्सवाची सेवेच्या दरम्यान गुजरातहून युवा तालीम केंद्र, युवक तालीम केंद्र, जयपुर युवक मंडळ आणखीही अन्य केंद्रातून शंभराहून अधिक तरुण आणि तरुणींनी अद्भूत कार्यात आपली सेवा देण्यासाठी जोधपूर पोहचले.
मंदिरात मूर्तीची स्थापना करण्याबरोबरच सत्संग आणि दैनंदिन पूजा आरतीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.
नित्य पूजा: दररोज पाच वेळा आरती केली जाईल, धुन अष्टक गायन, प्रसादिक थाळी आणि शृंगार देवाला अर्पण केले जाते.
साप्ताहिक बैठका: नियमित साप्ताहिक सत्संग बैठका घेतल्या जातील, ज्यामध्ये लहान मुलांसाठी बाल-बालिका बैठका, तरुण पुरुष आणि महिलांसाठी युवक सभा/युवती सभा आणि ज्येष्ठ भक्तांसाठी संयुक्त रवि सभा यांचा समावेश असेल.
उत्सव परंपरा: शिवरात्री, जन्माष्टमी, रामनवमी, स्वामीनारायण जयंती, गुरुपौर्णिमा, होळी, दिवाळी आणि अन्नकूट गोवर्धन पूजा यासारखे सनातन हिंदू धर्मातील सर्व प्रमुख सण आणि शुभ तिथीही या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरे केल्या जातील.