शिक्षिका पत्नीबद्दल सतत एकच गोष्ट खटकायची; नवरा इतका हैवान बनला की वाचून थरकाप उडेल

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. नवऱ्याने शिक्षिका पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याचे उघड झालं आहे.

शिक्षिका पत्नीबद्दल सतत एकच गोष्ट खटकायची; नवरा इतका हैवान बनला की वाचून थरकाप उडेल
| Updated on: Aug 13, 2026 | 12:28 PM

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात नवऱ्याने शिक्षिका बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोच्या हत्याकांडाने संपूर्ण फतेहपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नराधमाने बायकोची हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव रचत रुग्णालयातही नेल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. परंतु बायकोला रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्याने केलेल्या हत्येचा उलगडा झाला. नवऱ्याने शिक्षिका पत्नीची हत्या केल्याचे कळताच संपूर्ण फतेहपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवरा संशयी वृत्तीचा होता. त्याचा बायकोवर संशय होता. बायकोचे अफेअर चालू असल्याचा संशय नवऱ्याला होता. या संशयातून नवऱ्याने शिक्षिका असलेल्या बायकोची क्रूरपणे हत्या केली आहे. नासिरपीर मोहल्ला परिसरात ही संपूर्ण घटना घडली. शिक्षक पती कुमार यादवने दोन भावांच्या मदतीने मिळून खासगी शाळेत शिक्षक असलेल्या पत्नी शालिनीची हत्या केली. त्याने पत्नीवर अनैतिक संबंधाचा आरोप लावत कूकरच्या झाकणाने डोकं फोडलं. त्यानंतर गळा पकडून पाथटबमध्ये बुडवून जीवे मारलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक पुरावाच्या आधारावर मुख्य आरोपी दिलीप यादव याला तात्काळ अटक करण्यात आली. त्याला 12 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर केल्यानंतर न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अल्लीपूरध्ये सहायक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या दिलीप यादवने 8 ऑगस्ट रोजी सकाळी पत्नीची हत्या केली. दिलीपने आधी कूकरने पत्नीची डोकं फोडलं. त्यानंतर पत्नीची डोक्यात बाथटबमध्ये बुडवून हत्या केली. त्यानंतर आरोपी 20 मिनिटे बाहेर फिरत होता. त्याने भावांना फोन करून पत्नी बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी शालिनीच्या नातेवाईकांनी 9 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कारवाईला सुरुवात केली होती.

प्रेम विवाह केलेली शालिनी शहरात एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होती. दिलीप आणि शालिनीचे 3 डिसेंबर आणि शालिनीने 3 डिसेंबर 2017 रोजी ल्व्ह मॅरेज केलं होतं. लग्नानंतर शादीप आणि नासिरपीर भागात भाड्याने राहत असताना दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. आरोपीने चौकशीत पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. त्याने रागाच्या भरात बायकोची हत्या केल्याची कबुली दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us