थरारक! महिला मुख्याध्यापकावर 27 वेळा चाकूने सपासप वार; शिक्षणक्षेत्रात खळबळ, दहावीचा विद्यार्थी अन् शेवटच्या कॉलने हत्याकांडाचा पर्दाफाश
महिला मुख्याध्यापकावर 27 वेळा चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

खासगी शाळेतील मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांची राहत्या घरात चाकूने सपासप वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांड प्रकरणात त्यांच्या शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. घरात चोरी पकडल्यानंतर विद्यार्थ्यांनीच हत्या केल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापकाच्या हत्येने शिक्षणक्षेत्राच खळबळ उडाली आहे. हैदराबादच्या नलगोंडा जिल्ह्यातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक रुपा या 11 ऑगस्ट रोजी घरात एकटी असताना मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्यावर चाकूने 27 वेळा चाकूने वार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी सांगितली. त्या दिवशी रुपा या घरात तिच्या मावशीसोबत फोनवर बोलत असल्याचे तपासातून समोर आलं आहे. फोन बंद होण्याआधी शेवटच्या फोन संभाषणात मावळीसोबत बोलताना ‘बाबू’ हा शब्द उच्चारला होता. बाबू हा शब्द विद्यार्थ्यांना संबोधण्यासाठी सर्रास वापरला जातो. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या तपासाला दिवसेंदिवस गती मिळत आहे. दररोजच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांशी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. खरंतर मुलं हत्याकांडानंतर दोन मुले भरमसाट पैसे उधळू लागले होते. त्याचबरोबर मित्रांसोबत पार्टी करत होते. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. पोलिसांनी सांगितले की, या हत्याकाडांनंतर विद्यार्थी अचानक पैसे उधळत होते. त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करत होते. यामुळे दोघांवर संशय वाढला. त्यानंतर आम्ही दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं, असे नलगोंडाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपींकडून 1.51 लाख रुपयांची रोकड आणि एक आयफोन जप्त केला आहे. हत्याकांडानंतर पैसे पालकांना दिल्याचा दावा मुलांनी केला होता. या पैशांवर मानवी रक्तांशे अंश आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले. दोन्ही मुलांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यातील एकाला बाईक आणि कार चालवण्याची आवड होती. त्याला झटपट पैसे कमवायचे होते, असेही पोलिसांनी सांगितले. मुख्याध्यापकाची हत्या करण्याआधी दोघे त्यांच्या घरावर लक्ष ठेवून होते. त्यांनी हत्येच्या 5 दिवस आधी त्यांना संपवण्याचा कट रचला होता. पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी दोन्ही अल्पवयीन मुलांनी हातमोजे वापरले होते. सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणाची देखील पाहणी केली होती. या दोघांनी 11 ऑगस्ट रोजी एका विद्यार्थ्याने घराच्या कपाऊंडची भिंत ओलांडून घरामध्ये प्रवेश केला होता. तर दुसरा घराबाहेर थांबला होता. घरात शिरल्यानंतर अल्पवयीन मुलाने चोरी करण्यास सुरुवात केली. परंतु चोरी करताना मुख्याध्यापकाला विद्यार्थी दिसला. त्यानंतर त्याने मुख्याध्यापकावर चाकूने 27 वार केले. त्यानंतर घरातील अडीच लाख रुपये घेऊन फरार झाला. हत्येनंतर पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप आहे.