Rahul Gandhi : ‘मला पंतप्रधान मोदी आवडतात’, अमेरिकेत राहुल गांधी यांचं चक्रावून टाकणारं वक्तव्य

Rahul Gandhi : "संविधान संपलं तर सगळा खेळ संपणार. गरीब लोकांनी ही गोष्ट समजून घेतली, संविधानाची रक्षा करणारे आणि संविधान नष्ट करणारे यांच्यातली ही लढाई आहे" असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi : मला पंतप्रधान मोदी आवडतात, अमेरिकेत राहुल गांधी यांचं चक्रावून टाकणारं वक्तव्य
Rahul Gandhi Narendra Modi
| Updated on: Sep 10, 2024 | 11:09 AM

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे. पीएम मोदी मला आवडतात असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकलय. “भारत भाषा, परंपरा, धर्माचा एक संघ आहे. भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात, त्यावेळी ते विलीन होऊन जातात. भारताचा हा स्वभाव आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “भारत वेगवेगळ्या गोष्टींचा एक समूह आहे हा भाजपा आणि आरएसएसचा गैरसमज आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले नरेंद्र मोदी मला आवडतात. मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांचा जो दृष्टीकोन आहे, त्याच्याशी मी सहमत नाहीय. पण म्हणून मी त्यांचा द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

“संस्था ताब्यात घेतल्यात. आरएसएसने शिक्षण व्यवस्थेवर ताबा मिळवलाय. मीडिया आणि तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. आम्ही हे म्हणत होतो, पण लोकांना समजत नव्हतं. मी संविधान पुढे ठेवलं. संविधान संपलं तर सगळा खेळ संपणार. गरीब लोकांनी ही गोष्ट समजून घेतली, संविधानाची रक्षा करणारे आणि संविधान नष्ट करणारे यांच्यातली ही लढाई आहे. जातीय जनगणनेचा मुद्दादेखील मोठा झाला” असं राहुल गांधी म्हणाले.

‘ही स्वतंत्र निवडणूक नव्हती’

“निष्पक्ष निवडणुकीत भाजपा 246 च्या जवळ असती, असं मला वाटत नाही. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. आमची बँक खाती गोठवण्यात आलेली. निवडणूक आयोग तेच करत होता, जे त्यांना हवं होतं. संपूर्ण देशभरात मोदी काम करु शकतील असं अभियान बनवण्यात आलेलं. ज्या राज्यात ते कमजोर होते, तिथे वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेलं. मी याकडे स्वतंत्र निवडणूक म्हणून नाही, तर नियंत्रित निवडणूक म्हणून पाहतो” असं राहुल गांधी म्हणाले.