3,008 मेसेज, 65 फोटो… एका न्यूड फोटोसाठी गोपनीय माहिती फोडली, विंग कमांडर हनी ट्रॅपमध्ये

भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर पाकिस्तानी गुप्तहेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून देशाचा शत्रू बनला आहे. त्याने नग्न फोटोंच्या बदल्यात हवाई दलाची संवेदनशील माहिती (युद्ध योजना, ड्रोन क्षमता, सैन्य तैनाती) पाकिस्तानला लीक केली. दिल्ली पोलिसांनी चार्जशीट दाखल केली असून, या कृत्यामुळे राष्ट्राची सुरक्षा आणि लष्करी क्षमता धोक्यात आली आहे.

3,008 मेसेज, 65 फोटो... एका न्यूड फोटोसाठी गोपनीय माहिती फोडली, विंग कमांडर हनी ट्रॅपमध्ये
Pakistan spy honeytrap
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 11:43 AM

एकीकडे एनविडामधील हनी ट्रॅपची चर्चा सुरू असतानाच भारतातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. भारतीय हवाई दलाचा एक विंग कमांडर देशाचाच शत्रू बनला आहे. पाकिस्तानच्या गुप्तहेराच्या जाळ्यात अडकून त्याने हवाई दलाची संवेदनशील माहितीच पाकिस्तानला दिली आहे. दिल्ली पोलिसांनी एका न्यायालयात चार्जशीट दाखल करून त्याच्यावर अनेक आरोप ठेवले आहेत. पोलिसांच्या मते, या विंग कमांडरने एका न्यूड फोटोसाठी पाकिस्तानी गुप्तहेराला अत्यंत गोपनीय ऑपरेशनल माहिती दिली आहे. या विंग कमांडरला पाच महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

या विंग कमांडरने पाकिस्तानच्या गुप्तहेराला युद्धाच्या प्लानिंगशी संबंधित दस्ताऐवज, ड्रोनची क्षमता, सैन्य तैनातीच्या जागा, फ्रंटलाइन लढाऊ विमानांची ये-जा आणि संवेदनशील कोऑर्डिनेट्स शेअर केल्या होत्या. ही माहिती लीक केल्यामुळे सैन्यासह देशाला मोठा धोका निर्माण झाला असता. भारताची सैनिक क्षमता आणि ऑपरेशनल उणीवा शत्रूला माहीत पडल्या असत्या. त्यामुळे राष्ट्राची सुरक्षाच धोक्यात आली असती, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं आहे. चार्जशीटनुसार, विंग कमांडरने एक गुप्त ड्रोन युनिटची क्षमता आणि त्याच्या ढाच्याची माहितीही पाकिस्तानला पुरवली होती. यात ड्रोन यूनिटची ऑपरेशनल क्षमता, युद्धाच्या काळातील तैनातीची जागा आणि लढाऊ विमानांची माहितीही दिली होती.

Loading...

न्यूड फोटोसाठी

हा विंग कमांडर 12 जानेवारी ते 1 एप्रिलच्या दरम्यान व्हॉट्सअपवरून एका संशियत पाकिस्तानी गुप्तहेर एजंटच्या संपर्कात आला होता. जेव्हा तो आपल्या कार्यालयात स्मार्टफोन घेऊन गेला तेव्हा त्याला रोखण्यात आलं. त्याची तपासणी करण्यात आली. पाकिस्तानी एजंटकडून एक न्यूड फोटो मिळाल्यानंतर त्याने एक गुप्त युद्ध योजनेची माहिती असलेलं पान अपलोड केलं होतं. एवढेच नव्हे तर प्रत्येक न्यूड फोटोच्या बदल्यात युद्ध योजनेशी संबंधित एक नवीन पेज (पान) पाठवलं जाईल, असंही त्याने या पाकिस्तानी एजंटला म्हटलं होतं.

असे पाठवले दस्ताऐवज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी एजंटने काही मॅलवेअर अॅप्लिकेशन पाठवले होते. त्याच्या माध्यमातून या अधिकाऱ्याच्या डिव्हाइसमध्ये असलेली संवेदनशील माहिती आणि त्याची वरिष्ठ अधिकाऱ्याशी झालेली चर्चा एजंटने ऐकली होती. तसेच ही चर्चा पाहिलीही होती. चार्जशीटमधील माहितीनुसार, विंग कमांडरने लेहमधील लढाऊ विमानांची तैनाती आणि सूरतगडच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये झालेल्या सैन्य सरावाशी संबंधित माहिती लीक केली होती.

या चार्जशीटमध्ये विंग कमांडर आणि गुप्तहेर एजंट दरम्यान व्हॉट्सअपवरून किती चर्चा झाली होती याची माहिती समोर आली आहे. व्हाटसअपच्या पीएमपी डेटा विश्लेषणातून हे विवरण समोर आलं आहे. त्यानुसार विंग कमांडर आणि पाकिस्तानी एजंट दरम्यान एकूण 3,008 टेक्स्ट मेसेज, 65 फोटो, 65 रिअॅक्शन, 42 व्हाईस कॉल, 4 व्हिडीओ कॉल आणि 6 URL चे अदानप्रदान झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us