उत्तम कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडावी अशी CEO ची इच्छा, त्यासाठी कंपनीच स्वत: घेतेय पुढाकार, कारण काय

कुठे नोकरकपात कुठे नोकरी जाण्याची भीती. अशा परिस्थितीत बंगळूरूमधील एका कंपनीने मात्र अगदी उलट निर्णय घेतला आहे. या कंपनीचा CEO स्वत:च आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून देण्याचा सल्ला देत आहे.

उत्तम कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडावी अशी CEO ची इच्छा, त्यासाठी कंपनीच स्वत: घेतेय पुढाकार, कारण काय
viral news
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 14, 2026 | 5:06 PM

सध्या अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी नोकरी टिकवण्यासाठी धडपडत आहेत. कुठे नोकरकपात सुरू आहे तर कुठे नोकरी जाण्याची भीती कर्मचाऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत बंगळूरूमधील एका कंपनीने मात्र अगदी उलट निर्णय घेतला आहे. या कंपनीचा CEO स्वत:च आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सूरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. एवढंच नाही, तर व्यवसाय सुरू करताना काही अडचणी आल्या आणि तो जमला नाही,तर पुन्हा कंपनीत परतण्याची संधीही दिली जाणार आहे.

ही कंपनी आहे iD Fresh Food. कंपनीचे ग्लोबल CEO मुस्तफा पी. यांनी लिंक्डइनवर नव्या ‘एंटरप्रेन्योरशिप पॉलिसी’ ची घोषणा केली आहे. या धोरणानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना स्वत:चा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा आहे, त्यांना कंपनीकडून मदत केली जाणार आहे.

Loading...

या पॉलिसीमध्ये कर्मचाऱ्यांना तीन महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत. पहिली म्हणजे कंपनीचे व्यावसायिक नेटवर्क आणि भागीदारांशी संपर्क साधण्याची संधी. दुसरी म्हणजे कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि मेंटरशिप. तिसरी आणि महत्त्वाची सुविधा म्हणजे काही काळासाठी अंशत: पगारासह रजा. या काळात कर्मचारी आपल्या व्यवसायाच्या कल्पनेवर काम करू शकतील. विशेष म्हणजे व्यवसाय यशस्वी झाला नाही किंवा पुन्हा नोकरी करण्याची इच्छा झाली तर त्यांना कंपनीत परतण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

या निर्णयमागे मुस्तफा यांचा स्वत: चा व्यावसायिक प्रवास आहे. 2005 मध्ये त्यांनी आपल्या चुलत भावांसोबत मिळून iD Fresh Food ची सुरूवात केली. बंगळूरूमधील एका छोट्याशा स्वयंपाकघरातून सुरू झालेल्या या व्यवसायासाठी सुरूवातीला केवळ 50 हजार रूपयांचं भांडवल होतं. सुरूवातीच्या काळात अनेक चुका झाल्या, अडचणी आल्या, रात्रीची झोपही उडाली, मात्र काही लोकांनी त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवला आणि व्यवसाय उभा राहण्यास मदत केली

त्याच विश्वासाची परतफेड आता कर्मचाऱ्यांना संधी देऊन करायची आहे. असं मुस्तफा यांनी स्पष्ट केलं. आपल्या काही उत्तम कर्मचाऱ्यांना कंपनीचा निरोप देणं नक्कीच कठीण असेल असंही त्यांनी म्हटलं. पण हेच कर्मचारी स्वत:चा व्यवसाय उभा करून समाजासाठी काहीतरी मोठं काम करत असतील, तर त्याचा अधिक आनंद होईल, अशी त्यांची भावना आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us