
भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत यांचे एक महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. जयपूरातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की आपल्या ताकद असेल तर जगाला आपण प्रेमाची भाषेत सांगू शकतो, समजावू शकतो. शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषा देखील समजते असेही ते म्हणाले.त्यांनी आपल्या भाषणात भारताची प्राचीन संस्कृती आणि त्यागाच्या परंपरेला उजाळा दिला.ते पुढे म्हणाले की भारताच्या इतिहासात भगवान श्री रामापासून भामाशाह यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वांनी त्याग आणि सेवेचे नवा इतिहास घडवला आहे.
मोहन भागवत पुढे म्हणाले की जगाला धर्माची शिकवण देणे भारताचे कर्तव्य आहे. धर्माच्या आधारेच मानवतेचे उन्नती शक्य आहे. त्यांनी हिंदू धर्माबद्दल माहिती देताना सांगितले की विश्वकल्याण हाच आमचा प्रमुख धर्म आहे. त्यांनी भारता देशाला सर्वात प्राचीन असल्याचे सांगत भारताची भूमिका मोठ्या भावासारखी असल्याचे सांगितले.
भारत जगात शांती आणि सौहार्द कायम राखण्याच्या दिशेने निरंतर कार्यरत आहे. भारत कोणाचा द्वेष ठेवत नाही. परंतू जर आपल्याकडे शक्ती नसेल तर हे जग प्रेमाची आणि मांगल्य, सौहार्दाची भाषा समजत नाही. त्यामुळे या जगाचे कल्याण करण्यासाठी देखील आपल्याकडे शक्ती असणे आवश्यक आहे. आणि भारताची ताकद जगाने पाहीली आहे असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.
मोहन भागवत पुढे असेही म्हणाले की शक्ती हेच ते माध्यम आहे. ज्यामुळे जगात भारत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकतो. आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार आपण तेव्हाच करु शकू जेव्हा आपल्याकडे ताकद असेल, ही जगाची रितच आहे तिला आपण बदलू शकत नाही असे आपण आधीच सांगितले आहे. यावेळी त्यांनी संत समाजाची भूमिकेची प्रशंसा केली आणि ते म्हणाले की संत आणि ऋषीमुनी परंपरा राबवून संस्कृती आणि धर्माचे रक्षण करत आहेत.