धो-धो बसरणार, महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert : उद्या म्हणजेच शुक्रवार (7 ऑगस्ट) देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धो-धो बसरणार, महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी
IMD 7 August Rain Alert
Image Credit source: Google
| Updated on: Aug 06, 2026 | 11:39 PM

देशाच्या अनेक भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच आता उद्या म्हणजेच शुक्रवार (7 ऑगस्ट) देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये म्हणजेच जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हरियाणा, दिल्ली, चंदीगड तसेच पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मध्य भारतातही पावसाचा जोर कायम राहणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्य भारतात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज असून छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पूर्व भारतातील अंदमान-निकोबार बेटे, गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड येथेही उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्वोत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने पूर्वोत्तर भारतासाठीही सतर्कतेचा इशारा दिला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांत अतिवृष्टी, वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण भारतातही पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातही पावसाचा जोर कायम आहे. आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, तेलंगणा, उत्तर आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये पावसाची संततधार सुरू राहणार आहे. केरळ, माहे, लक्षद्वीप, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे मेघगर्जनेसह पाऊस, वीज पडण्याची आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. किनारी कर्नाटक आणि तेलंगणातही वेगवान वारे वाहण्याचा अंदाज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us