
पाकिस्ताने काही दिवसांपूर्वीच इंटनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) कडून एक बिलियन डॉलरचं कर्ज घेतलं आहे. मात्र पाकिस्तानकडून आएमएफचा पैसा हा दहशतवाद्यांना पोसण्यासाठी उपयोगात आणला जात असल्याचं देखील अनेकदा समोर आलं आहे. मात्र असं असताना देखील आयएमएफने पाकिस्तानला पुन्हा एकदा मदत केल्यानं या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. मात्र आता आयएमएफला एक वेगळीच चिंता सतावत आहे, पाकिस्तान आपले पैसे बुडवणार तर नाही ना? अशी भीती इंटनॅशनल मॉनेटरी फंडला वाटत आहे. त्यामुळे आता आयएमएफने मोठं पाऊल उचललं आहे.
आयएमएफने पाकिस्तानला कर्जाचा पुढचा हाफ्ता देण्यापूर्वी 11 नव्या अटी घातल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेला तणाव यामुळे पाकिस्तानला कर्ज देण्यामध्ये जोखीम आणखी वाढली आहे, असंही यावेळी आएएमएफने म्हटलं आहे.
काय आहेत त्या अटी?
पुढच्या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला 17,600 अब्ज रुपयांच्या नव्या बजेटला मान्यता देणे अनिर्वाय राहील.
वीज उत्पादन, आणि वीज उत्पादनातून मिळणारे उत्पन्न यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे.
तीन वर्षांपेक्षा जुन्या वापरलेल्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठवावी लागणार
नवीन कृषी उत्पन्न कायद्याची अंमलबजावणी, ज्यामुळे करदात्याची ओळख पटेल, रिर्टन प्रक्रिया सुधारेल.
देशामध्ये संचार प्रणाली अधिक मजबूत करावी लागणार
आयएमएफने ऑपरेशनलशी संबंधित केलेल्या शिफारशी आधिक गांभीर्यानं घ्याव्या लागणार
2027 नंतरची आर्थिक रणनिती देखील आतापासूनच तयार करावी लागणार
ऊर्जा क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी कार्यक्रम राबवावे लागणार
यासह आणखी काही अटी पाकिस्तानला घालण्यात आल्या आहेत, तसेच पाकिस्तानला आयएमएफचं हे कर्ज पुढील तीन वर्षांमध्ये फेडावं लागणार आहे.
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर
पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे, पाकिस्तानने केवळ आयएमएफकडूनच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय बँकांकडून देखील कर्ज घेतलं आहे. पाकिस्तानला आता हे सर्व कर्ज पुढील तीन वर्षांमध्ये फेडायचं आहे, मात्र पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहाता हे अशक्य वाटत आहे. पाकिस्तानवर दबाव वाढत आहे.