Budget 2025 : महिलांसाठी बजेटमध्ये खूप चांगली आणि महत्त्वाची घोषणा, मजुरांसाठी काय?

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेट सादर करताना शेतकरी, महिला आणि मजुर वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महिला उद्योजिका घडवण्यासाठी सरकारने खरच काही चांगले निर्णय घेतले आहेत.

Budget 2025 : महिलांसाठी बजेटमध्ये खूप चांगली आणि महत्त्वाची घोषणा, मजुरांसाठी काय?
Budget 2025
| Updated on: Feb 01, 2025 | 12:43 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यात शेतकरी क्रेडिट कार्डाची लिमिट वाढवली आहे. बिहारसाठी मखाना बोर्डची घोषणा केली आहे. कामगारांसाठी सुद्धा अनेक घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी सुद्धा या बजेटमध्ये बरच काही आहे. या बजेटमध्ये महिला, शेतकरी आणि मजुरांसाठी काय आहे? ते जाणून घेऊया.

महिलांसाठी काय?

सरकार 10 हजार कोटी रुपयाचं योगदान देऊन स्टार्टअप्ससाठी फंडची व्यवस्था करेल. सरकार पहिल्यांदा पाच लाख महिला, एससी आणि एसटी उद्योजिका घडवण्यासाठी 2 कोटी रुपये कर्ज देईल.

महिलांना विना गॅरेंटी सहज अटींवर लोन मिळेल. जेणेकरुन त्यांना छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरु करता येईल. सरकारच्या या योजनेत महिलांना 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपये टर्म लोनची सुविधा मिळेल. याचा 5 लाख महिलांना फायदा होईल.

महिलांना उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांची जोडण्याची संधी दिली जाईल.

शेतकऱ्यांसाठी काय?

बजेटमध्ये शेतकरी क्रेडिड लिमिट 3 लाखावरुन वाढवून 5 लाख करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, यूरिया उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी सरकार बंद पडलेले 3 यूरिया प्लांट पुन्हा सुरु केलेत. यूरिया पुरवठा वाढवण्यासाठी आसामच्या नामरुप येथे 12.7 लाख मॅट्रिक टन वार्षिक क्षमतेचा प्लांट लावला जाईल.

कामगारांसाठी काय?

ऑनलाइन प्लेटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांना ई-श्रम पोर्टलवर रजिस्टर करुन ओळखपत्र देण्यात येईल. पीएम जन आरोग्य योजनेतंर्गत आरोग्य सुविधा दिली जाईल. जवळपास 1 कोटी गिग कामगारांना याचा लाभ मिळेल.