
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सर्व जगाचं लक्ष या दोन देशांकडे लागलं आहे. कारण हे दोन्ही देश न्यूक्लीयर पावर आहेत. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालचं तर यामध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि गाझा, रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धापेक्षाही हे नुकसान कितीतरी पटीनं अधिक असणार आहे.
त्यामुळे जगभरातील ज्या काही महत्त्वाच्या अर्थ संस्था आहेत, त्यांनी या युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात? याबाबतचे आपले रिपोर्ट सादर केले आहेत. जगातील सर्वोच्च रेटिंग एजन्सींपैकी एक असलेल्या ‘मूडीज’चा देखील असाच एक अहवाल समोर आला आहे. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर त्याचा भारताला कोणताही विशेष आर्थिक फटका बसणार नाही, मात्र पाकिस्तानचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असू शकतो. या युद्धामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येईल असं मूडीजनं आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे.
‘मूडीज’नं सोमवारी यासंदर्भातील रिपोर्ट सादर केला आहे. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर त्याचा विशेष असा फटका भारतीय अर्थवव्यस्थेला बसेल असं कुठेही दिसून येत नाहीये, मात्र दुसरीकडे याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसू शकतो. पाकिस्तानचा आर्थिक वृद्धी दर आता हळूहळू सुधारत आहे. मात्र युद्ध झाल्यास त्याचा प्रचंड नकारात्मक परिणाम त्यांच्या आर्थिक वृद्धी दरावर होणार आहे. तसेच या युद्धामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येईल असंही मूडीजने म्हटलं आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालं आहे. पाकिस्तानी सैन्याच्या पीओकेमधील हालचाली वाढल्या असून, त्यांच्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलं जात आहे. तर दुसरीकडे भारताच्या गृहमंत्रालयाने देखील आता येत्या सात मे रोजी मॉक ड्रील घेण्याच्या आणि सायरन वाजवण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.