AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले

लग्नास नकार दिल्याने नंतर माथेफिरु तरुणांकडून आपल्या प्रेयसीला संपण्याच्या घटना घडत असतात. परंतू एका तरुणाने लग्नास नकार दिलेल्या तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिल्याचे घटना घडली आहे.

धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
crime news
| Updated on: Mar 14, 2026 | 8:34 PM
Share

तेलंगणाच्या घाटकेसर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. एका एचआयव्ही पॉझिटिव्ह तरुणाने लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला आपल्या एड्सने संक्रमित इंजेक्शन टोचल्याची घटना घडली आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांनी त्वरित या तरुणाला शनिवारी अटक केली आहे.

पोचारम पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ मार्च रोजी ही निदर्यी घटना घडली. आरोपी मनोहर याने तरुणीच्या घरी जाऊन या तरुणीशी जबरदस्ती केली आणि तिच्या शरीरात एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. घटनेनंतर या तरुणीला ताप आला. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. या युवतीवर उपचार सुरु असून तिची स्थिती चिंताजनक आहे.

काय नेमकी घटना?

हा धक्कादायक प्रकार हैदराबादच्या घाटकेसर स्थित पोचारम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ मार्च रोजी घडला. आरोपी मनोहरला पोलिसांनी शनिवारी १४ मार्च रोजी अटक केली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात पोलिसांनी मनोहरला अटक केल्याचे दिसत आहे.

आरोपीचे नाव मनोहर असे आहे. मनोहर याचे या तरुणीसोबत प्रेम होते. आणि त्याने तिच्याशी साखरपुडाही केला होता. मात्र, नंतर तरुणीच्या कुटुंबियांना कळले की मनोहर आणि त्याचे आई-वडील एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. नंतर हे लग्न मोडण्याचा निर्णय तरुणीच्या कुटुंबियांनी केला. या नकाराने चिडलेल्या मनोहरने अखेर हे निर्दयी कृत्य केले.

बदला घेण्याच्या इराद्याने

लग्न मोडल्याने मनोहर चिडला होता. बदला घेण्याच्या इराद्याने त्याने हा धक्कादायक प्रकार केला. या प्रकारचा गुन्हा कायद्याने तर मोठा गंभीर आहेच शिवाय मानवतेच्या दृष्टीने देखील हीन दर्जाचा आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांवर दबाव आला. अखेर पोलिसांनी १४ मार्च रोजी आरोपीला मनोहर याला अटक केली. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल