सोशल मीडियावर येत तिने ‘एकच प्याला’ हातात धरला, अमृत समजून घशात रिचवला आणि…

एका मुलीने सोशल मीडियावर लाईव्ह येत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यावेळी तिने हातात 'एकच प्याला' घेतला होता. सोशल मीडियावर ती घटना सांगत होती. अचानक तिने तो अमृताचा प्याला असल्यासारखा घशात रिचविला.

सोशल मीडियावर येत तिने एकच प्याला हातात धरला, अमृत समजून घशात रिचवला आणि...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 23, 2023 | 8:11 PM

उत्तर प्रदेश : आझमगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने सोशल मीडियावर लाईव्ह येत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यावेळी तिने हातात ‘एकच प्याला’ घेतला होता. सोशल मीडियावर ती घटना सांगत होती. अचानक तिने तो अमृताचा प्याला असल्यासारखा घशात रिचविला. काही कळण्याआधीच ती बेशुद्ध झाली. लागलीच तिच्या कुटुंबीयांनी तेथे धाव घेतली. तिला रुग्णालयात दाखल केले. आणि त्यामधून जे सत्य बाहेर आले ते भयानक होते. देशात तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. किरकोळ वादातून आलेल्या नैराश्यातून अनेकांनी मृत्यूला कवटाळले आहे. या तरुणीनेही असेच टोकाचे पाऊल उचलले.

आझमगड जिल्ह्यातील बिलरियागंज पोलीस स्टेशन हद्दीतील गद्दोपूर गावातील ही घटना आहे. प्रेमात फसवणूक झाल्यावर ती मुलगी आतून इतकी तुटली की मरण्याशिवाय तिने दुसरा कुठलाच विचार केला नाही. फेसबुकवर लाईव्ह येऊन त्या तरुणीने जो प्याला हातात धरला होता त्यात अमृत नसून विष घेतले होते.

तरुणीचे हे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण प्रेम आहे. तिचे एका तरुणावर प्रेम होते. लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. पण, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचा आधीच विवाह झालेला आहे ते त्या तरुणीला कळले तेव्हा ती पूर्णतः तुटून गेली.

पीडित तरुणीने विष प्राशन करण्यापूर्वी आपल्यासोबत प्रियकराने केलेल्या विश्वासघाताची कहाणी सांगत आहे. कुंदन नावाच्या तरुणावर तिचे प्रेम होते. आरोपीचेही तिच्यावर प्रेम होते. मात्र, जेव्हा तिचा प्रियकर विवाहित असल्याचे समजले तेव्हा तिला धक्काच बसला. म्हणजेच आरोपीने आपल्याला कुमारीका सांगून, प्रेमाचे नाटक करून आपल्या जाळ्यात अडकवले असा आरोप तिने केला.

या घटनेमुळे माझ्यासमोर मृत्यूशिवाय दुसरा काहीच मार्ग शिल्लक नाही. असे सांगत तिने ती विषाचा प्याला घशात रिकामी केला. यासोबतच प्रियकराचे संपूर्ण कुटुंबच माझ्या मृत्यूचे कारण आहे असेही ती म्हणाली.

मला काही झाले तर माझ्या मृत्यूला कुंदन जबाबदार असेल. कुंदनचे संपूर्ण कुटुंब आणि त्याची पत्नीही माझ्या मृत्यूचे कारण असेल. या सर्वांनी मिळून माझी फसवणूक केली आहे. संपूर्ण कुटुंबाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला न्याय मिळावा अशी माझी पोलिसांना विनंती आहे, असे ती म्हणाली.

त्या तरुणीचा मुलीचा मृत्यू झाला नसला तरी तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिस आणि कुटुंबीयांच्या मदतीने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तरुणीने आरोप केलेल्या प्रियकरा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.