AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या हातचे गूळ, पाणी त्याच्या नशिबी नव्हतं, पोलिसांचा दबाब, धमक्या आणि त्याच्या जीवनयात्रेचा…

पोलिसांचा दबाव आणि आरोपींच्या सततच्या धमक्या यामुळे तो निराश झाला होता. त्यातच तुझ्यामुळे एकाने विष घेतले. तुझ्याविरोधात तक्रार करू अशी धमकी आल्याने तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याने फोन बंद केला. गावातीलच दुकानातून दोरी घेतली.

मुलीच्या हातचे गूळ, पाणी त्याच्या नशिबी नव्हतं, पोलिसांचा दबाब, धमक्या आणि त्याच्या जीवनयात्रेचा...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 23, 2023 | 5:04 PM
Share

उत्तर प्रदेश : पोलिसांचा दबाव आणि आरोपींच्या सततच्या धमक्या यामुळे तो निराश झाला होता. त्यातच तुझ्यामुळे एकाने विष घेतले. तुझ्याविरोधात तक्रार करू अशी धमकी आल्याने तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याने फोन बंद केला. गावातीलच दुकानातून दोरी घेतली. दिवसभर इकडे तिकडे भटकला आणि संध्याकाळी घरापासून चार किमी अंतरावर असलेल्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आजूबाजूच्या लोकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा फोन पोलिसांनी ऑन केला. पहिलाच कॉल पुतण्याचा होता. काकांशी बोलण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावर पोलिसांना सांगितले, काकांनी आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या घरात एकच हलकल्लोळ झाला.

पिलीभीतच्या अमरिया पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. आठवीत शिकणारी १४ वर्षाची मुलगी आपल्या कुटूंबासह रहात होती. आई वडील, ५ बहिणी आणि २ भाऊ यामध्ये बहिणींमध्ये ती तिसरी. शेती करून वडील कुटुंब चालवायचे. ९ मे रोजी तिचे वडील आणि २३ वर्षाचा मोठा भाऊ नेहमीप्रमाणे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात काम करत होते. ती मुलगी वडील आणि भावासाठी घरातून पाणी आणि गूळ घेऊन शेताकडे निघाली.

ती शेताकडे निघाली असताना वाटेत तिला बाजूच्या गावातीलच हरेंद्र, रोहित आणि शेखर भेटले. त्यांनी तिला फूस लावली आणि सोबत घेऊन गेले. खूप वेळ झाला तरी मुलगी शेतात न पोहोचल्याने वडील आणि भाऊ काळजीत पडले. दुसरीकडे घरी आईनेही विचारले की अजून ती परत का आली नाही?

वडील आणि भाऊ घरी आले. त्यांना कळले की मुलगी घरी नाही आणि शेतातही आली नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच गावातील सर्व जण शोधकार्यात गुंतले. रात्रीचे 8 वाजले. मात्र, काहीच कळू शकले नाही. मग, त्या कुटुंबाने मध्यरात्रीच आमरिया पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करून घेतली. त्यावेळी कोणावरच संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलीस तपासात गुंतले.

इकडे हरेंद्र, रोहित आणि शेखर यांनी त्या मुलीला राहुलकडे सोपवले. राहुलने त्याच रात्री तिच्यावर अत्याचार केला. पण, राहुलच्या काकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले.

राहुलच्या काकांना कसे कळले ?

हरेंद्र, रोहित, शेखर आणि राहुल हे एकाच गावातील आहेत. पीडित मुलीच्या घरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या त्याचे गाव आहे. त्या तिघांनी मुलीला गावाबाहेर एका ठिकाणी ठेवले. त्यानंतर त्यांनी राहुलला फोन करून बोलावून घेत तिला त्याच्या हवाली केले.

राहुल त्या मुलीला घेऊन मामा मनोज यांच्या किच्छा येथील नवीन घरी गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. राहुल काही तरी गडबड करत आहे असे लक्षात येताच त्यांनी मनोज याचे घर गाठले. तिथून मुलीची सुटका केली. पोलीस त्या मुलीचा शोध घेत असल्याचे कळल्यावर त्यांनी त्या पीडित मुलीला पोलीस स्टेशनला आणले.

पीडित मुलीने घटना संगितली

पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना बोलावून त्यांच्याकडे तिला सुपूर्द केले. 10 मे रोजी मुलगी आपल्या घरी परतली होती. तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्याआधारे तिचे वडील दररोज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी जात होते. 11 मे रोजी गेले. 12, 13 मे रोजीही ते पोलीस ठाण्यात गेले. पण पोलीस त्यांची तक्रार नोंदवून घेत नव्हते.

आरोपींना वेगळा कट रचला.

पीडितेस वडील पोलीस ठाण्यात जात आहेत हे आरोपींना समजताच त्यांनी वेगवेगळे कट रचण्यास सुरुवात केली. आरोपी हरेंद्र याचा मामा महेंद्र याचे घर पीडितेच्या गावी आहे. महेंद्र याने पोलिस स्टेशन आणि स्थानिक नेत्यांवर दबाव आणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. महेंद्र पीडितेच्या घरी जाऊन त्या कुटुंबाला धमकावत होता.

महेंद्रने त्या मुलीचा वडिलांना अनेकदा फोन केला. प्रत्येक वेळी या प्रकरणात अडकू नका अन्यथा तुम्हालाच गोवण्यात येईल अशी धमकी देत होता. राहुलने तुझ्यामुळे विष घेतले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करू, असेही तो म्हणाला.

पोलिसांनीही धमकावले

पीडित मुलीच्या वडिलांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी आरोपीही पोलीस ठाण्यात आले होते. पोलिसांना तडजोड करून हे प्रकरण मिटवायचे होते. पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी कारवाई व्हावी अशी मागणी केली. पण पोलिस त्यांचे ऐकत नव्हते. पोलिस स्टेशनचे निरीक्षक मुकेश शुक्ला यांनी वडिलांना शिवीगाळ केली. येथून पळून जा, कुठेही दुर जा नाही तर तुम्हालाच तुरुंगात पाठवीन अशी धमकी दिली.

अखेर गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी धमकी दिल्यांनतर वडील अस्वस्थ झाले. मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आपल्याला न्याय मिळत नाही. मुलीची झालेली बदनामी ते सहन करू शकले नाहीत. 17 मे रोजी सकाळी पोलिस ठाण्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन घराबाहेर पडले. मात्र, पोलिस ठाण्यात पोहोचले नाहीत. अखेर, त्यांच्या कटुंबाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ती नको असणारी बातमी कळली.

आत्महत्येनंतर पोलीस यंत्रणा लागली कामाला

पीडित वडिलांच्या आत्महत्येनंतर मात्र पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यांनी राहुल, रोहित, शेखर आणि मनोज यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण, हरेंद्रचा यात समावेश नव्हता. जेहानाबादचे सीईओ प्रतीक दहिया यांनी निरीक्षक मुकेश शुक्ला यांना निलंबित केले. पीडितेचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर राहुल, रोहित यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. तर, शिखर आणि मनोज फरार आहेत.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.