AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2.50 कोटीची बिल्डिंग, 50 लाखांची कार, प्लॉट, शेत जमीन, महागड्या गाड्या अन्..महिला अधिकाऱ्याकडे सापडला डोळे विस्फारतील असा कोट्यवधीचा खजिना

ACB ने 16 नोव्हेंबर रोजी आठ ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. वाणी यांचं घर, कार्यालय, त्यांचे नातेवाईक, सहकारी आणि अन्य ठिकाणी छापेमारीची ही कारवाई झाली. यात डोळे विस्फारतील असा खजिना सापडला.

2.50 कोटीची बिल्डिंग, 50 लाखांची कार, प्लॉट, शेत जमीन, महागड्या गाड्या अन्..महिला अधिकाऱ्याकडे सापडला डोळे विस्फारतील असा कोट्यवधीचा खजिना
woman officer gundhu vani
| Updated on: Nov 17, 2026 | 9:37 AM
Share

देशात काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करतात आणि चुकीच्या पद्धतीने माया जमवतात. अशी अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. या सरकारी बाबूंकडे सापडणाऱ्या संपत्तीचा आकडा पाहिला की थक्क व्हायला होतं. आता तेलंगणमध्ये असचं एक प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगा रेड्डी जिल्ह्यात एका टाऊन प्लानिंग ऑफिसर विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा गुन्हा नोंदवला आहे. या महिला अधिकारी असून त्या मोइनाबाद नगर पालिकेत तैनात होत्या. गुंडू वाणी असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे कथित भ्रष्टाचार आणि चुकीच्या मार्गाने गोळा केलेली 6.76 कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. गुंडू वाणी यांना लाचखोरीच्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ACB ने 16 नोव्हेंबर रोजी आठ ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. वाणी यांचं घर, कार्यालय, त्यांचे नातेवाईक, सहकारी आणि अन्य ठिकाणी छापेमारीची ही कारवाई झाली. अधिकाऱ्यांना या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात चल आणि अचल संपत्ती आढळून आली. उत्पन्नाच्या अधिकृत स्त्रोतांपेक्षा ही संपत्ती जास्त असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

किती आणि कुठे संपत्ती आहे?

ACB नुसार ज्या अचल संपत्तीची ओळख पटवण्यात आलीय, त्यात महबूबनगर जिल्ह्यातील 283.11 चौरस यार्ड आणि जनगांव जिल्ह्यातील 424 चौरस यार्डचे दोन खुले प्लॉट आहेत. या दोन्ही प्लॉटची अंदाजित किंमत 87.67 लाख रुपये आहे. या महिला अधिकाऱ्याकडे 63 लाख रुपये किंमतीचा रहिवाशी फ्लॅट आणि जवळपास 2.45 कोटी किंमतीची तीन मजली रहिवाशी इमारत सुद्धा असल्याचा आरोप आहे.

वास्तविक किंमत खूप जास्त

अधिकाऱ्यांनी महबूबनगर जिल्ह्यात 1.10 एकरची कृषी भूमी सुद्धा शोधून काढली आहे. त्याची किंमत 29.70 लाख रुपये आहे. ACB नुसार या संपत्तीची वास्तविक किंमत खूप जास्त आहे. छाप्यामध्ये चल संपत्तीमध्ये 5.47 लाख रुपयाची रोकड सापडली. त्या शिवाय ‘तुलजा भवानी वाइन’मध्ये 50 लाखाची गुंतवणूक आणि 1.30 कोटी रुपयांचे शेअर आढळून आले.

घरातल्या सामानाची अंदाजित किंमत 5.10 लाख रुपये

गुंडू वाणी यांचा 7.97 लाख रुपयांचा बँक बॅलन्स आहे. 175.1 ग्रॅम सोन्याचे आभूषण आणि 50 लाख रुपयांचं वाहन आढळून आलं. या वाहनांमध्ये महिंद्रा XUV700 आणि एका हुंडई क्रेटा गाडी आहे. घरातल्या सामानाची अंदाजित किंमत 5.10 लाख रुपये आहे. ACB ने जी प्राथमिक चौकशी केली आहे, त्याच्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपी अधिकाऱ्याकडे जवळपास 6.76 कोटी रुपयाची संपत्ती आहे.

Follow Us
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा