आयटी रेड : वाघाच्या कातडीनंतर आता सांबर, काळवीट, हरणाची शिंगंही जप्त

भोपाळ (मध्य प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना, विविध राजकारणी, उद्योगपती यांच्यावर आयकर विभाग, निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यानुसार गेल्या रविवारपासून (6 एप्रिल) मध्यप्रदेशातील काही मोठे व्यापारी, राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. काल या छापेमारीत आतापर्यंत 281 कोटी रुपयांची संपत्ती, देशी-विदेशी दारु, […]

आयटी रेड : वाघाच्या कातडीनंतर आता सांबर, काळवीट, हरणाची शिंगंही जप्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

भोपाळ (मध्य प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना, विविध राजकारणी, उद्योगपती यांच्यावर आयकर विभाग, निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यानुसार गेल्या रविवारपासून (6 एप्रिल) मध्यप्रदेशातील काही मोठे व्यापारी, राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. काल या छापेमारीत आतापर्यंत 281 कोटी रुपयांची संपत्ती, देशी-विदेशी दारु, शस्त्र आणि वाघाची कातडी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता अश्विन शर्मा यांच्या घरातून सांभराचे शिंग, काळे हरीण, चिंकाराचे शिंग तसेच अन्य काही मृत प्राण्यांच्या कातडी जप्त करण्यात आल्या आहे. या सर्व वस्तू वन विभागाकडे देण्यात आल्या आहे. सध्या वन विभाग याची चौकशी करत असून त्याची साधारण किंमत किती असू शकते याचा अंदाज काढत आहे.

अशाप्रकारे कारवाईला सुरुवात

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काळा पैशाची उलाढाल होत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने दिल्ली, इंदूर, भोपाळ, गोवा या चार राज्यांमध्ये काही राजकारणी तसेच मोठ्या कंपन्यांवर धाड टाकण्याचा निर्णय घेतला. यानुसार दिल्लीच्या आयकर कार्यालयातून अधिकारी विविध ठिकाणी रवाना झाले.  दिल्ली, इंदूर, भोपाळ, गोवा या चार राज्यांमधील जवळपास 52 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. यात 300 पेक्षा अधिक आयकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री 3 च्या सुमारास आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाईस सुरुवात केली. यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड, राजेंद्र कुमार मिगलानी, अश्विन शर्मा, पारसमल लोढा, प्रतीक जोशी तसेच मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी यांच्या घरावर धाडी टाकल्या. यात एकट्या प्रवीण कक्कड यांच्या घरातून तब्बल 9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

त्यानंतर काल संध्याकाळी आयकर विभागाने केलेल्या कारवाईत अश्विन शर्मा यांच्या घरात वाघाची कातडी, सांबराची शिंगे, काळे हरीण, चिंकाराचे शिंग, वाघाचे तोंड आणि काही मेलेल्या प्राण्यांच्या कातडी सापडली आहे. या प्राण्यांची शिकार करुन अश्विन यांनी त्यांच्या घरातील भिंतीवर लावली होती. त्याशिवाय त्यांच्या घरात तीन अवैध शस्त्रही जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अश्विन यांनी वाघाच्या कातडीचा उपयोग टेबल क्लॉथ म्हणून केला होता. या सर्व वस्तू वन विभागाकडे देण्यात आल्या आहे. सध्या वन विभाग याची चौकशी करत असून त्याची साधारण किंमत किती असू शकते याचा अंदाज काढत आहे.

तसेच अश्विन यांच्याकडे प्लॅटिनम प्लाझा या ठिकाणी बरेच फॅल्ट असल्याचेही उघडकीस आले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे आठ महागड्या गाड्या आहेत.  यात 3 मर्सिडिज, 3 विंटेज कार, 2 लँडरोवर या गाड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे प्लॅटिनम प्लाझा मध्ये असलेल्या चौथ्या व सहाव्या मजल्यावर फॅल्टमध्ये त्यांचे नातेवाईक राहत होते.

दरम्यान आतापर्यंत केलेल्या या छापेमारीत 14 करोड 6 लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच 252 देशी-विदेशी महागडी दारु, हत्यारे, वाघाची कातडीही या छापेमारीत आयकर विभागाने जप्त केली आहे. तसेच दिल्लीच्या एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाकडे 230 कोटी रुपयांचे गुप्त व्यवहार, खोट्या बिलांच्या सहाय्याने केलेली 242 कोटी रुपयांपेक्षा अधिक टॅक्स चोरी उघड झाली आहे. तसेच 80 पेक्षा अधिक कर बुडवणाऱ्या कंपन्या उघडकीस आल्या आहे. आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत मध्यप्रदेशातील व्यापारी, राजकारणी आणि वरिष्ठ नोकरदाऱ्यांच्या घरावर धाड टाकली आहे. यात एकूण 281 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

कोण आहेत अश्विन शर्मा? 

अश्विन शर्मा हे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांचे जवळचे नातेवाईक आहे. अश्विन यांचे स्वत:चे आरोग्य जनकल्याण नावाचे एनजीओ आहे. अनेकांची विविध ठिकाणी बदली करण्यात अश्विन यांचा हात आहे. त्याशिवाय त्यांच्या अनेक मोठ्या आयएएस ऑफिसर पर्यंत ओळखी आहेत.

संबंधित बातम्या:

देशभर आयटीचे छापे, 300 अधिकारी, 52 ठिकाणं आणि 281 कोटींची जप्ती

कमलनाथ यांच्या पीएसह निकटवर्तीयांच्या घरांवर धाडी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.