कमलनाथ यांच्या पीएसह निकटवर्तीयांच्या घरांवर धाडी

भोपाळ: येत्या 11 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणूक सुरु होण्याआधी मध्यप्रदेशात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्यासह इतर दोन जणांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत 9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाद्वारे रात्री 3 वाजता ही …

, कमलनाथ यांच्या पीएसह निकटवर्तीयांच्या घरांवर धाडी

भोपाळ: येत्या 11 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणूक सुरु होण्याआधी मध्यप्रदेशात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रवीण कक्कड यांच्यासह इतर दोन जणांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीत 9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाद्वारे रात्री 3 वाजता ही छापेमारी करण्यात आली.

दिल्ली, इंदूर, भोपाळ, गोवा यांसह इतर 50 ठिकाणी आयकर विभागाद्वारे छापेमारी करण्यात येत आहे. या छापेमारीत 300 पेक्षा अधिक आयकर अधिकारी सहभागी आहेत. यात मुख्यमंत्र्यांचा भाचा रातुल पुरी यांच्या घरासह इतरांच्या घरावरही धाडी टाकल्या आहेत. तसेच भोपाळच्या अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर या कंपन्यांवर छापे मारले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या आयकर विभागाने विजयनगर येथे राहणाऱ्या प्रवीण कक्कड यांच्या घरी व आजूबाजूच्या ठिकाणी छापेमारी केली. पहाटे 3 वाजता ही छापेमारी सुरु झाली. दरम्यान अजूनही छापेमारी पूर्ण झालेली नसून आयकर विभागाचे अधिकारी अद्याप कक्कड यांच्या घरी आहेत. प्रवीण कक्कड यांच्या घरातून आतापर्यंत 9 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. तसेच प्रवीण कक्कड यांच्यासह राजेंद्र कुमार मिगलानी यांच्याही घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्याशिवाय मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये राहणाऱ्या प्रतीक जोशी यांच्या घरीही आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्यांच्या घरातूनही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पहाटेपासून आतापर्यंत दिल्ली, मध्यप्रदेशातील भोपाळ आणि इंदूरच्या सहा ठिकाणी आयकर विभागाने धाड टाकली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काळा पैशाची उलाढाल होत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने हे छापे टाकले आहेत. या छापेमारीमुळे मध्यप्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहे प्रवीण कक्कड? 

प्रवीण कक्कड हे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत. प्रवीण कक्कड यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 2004 साली कक्कड यांनी नोकरी सोडून काँग्रेस नेते कांतीलाल भूरिया यांचे खासगी सचिव म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर डिसेंबर 2018 पासून ते मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. ते मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नोकरीला लागताच त्यांच्या विरोधात गैरव्यवहाराच्या अनेक गुन्हांची नोंद करण्यात आली. याची चौकशी सध्या सुरु आहे.

राजेंद्र कुमार मिगलानी कोण आहे ?

राजेंद्र कुमार मिगलानी हे कमलनाथ यांच्या फार जवळचे आहेत. जवळपास 30 वर्षांपासून कमलनाथ आणि मिगलानी एकत्र आहे. अनेकदा कमलनाथ मिगलानींकडून सल्ला घेतात. त्याशिवाय कमलनाथ यांची अनेक काम, दौरे यांसह इतर राजकीय काम स्वत: मिगलानी बघतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *