
भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. ब्रिटीशांनी आपल्या देशावर राज्य करुन आपली साधनसामुग्री लुटली. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाऱ्याच्या नावाखाली सन 1600 मध्ये भारतात आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांच्यापासून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्व वेचले. परंतू काही नावे आपल्याला माहिती आहेत तर काही नावे आपल्याला माहिती देखील नाहीत. स्वातंत्र्यासाठी काही महिला स्वातंत्र्य सैनिकांनी देखील आपले आयुष्य वेचले. चला या महिला स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला वंदन करुया ज्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1.बेगम रोयका ( Begam Royeka ) जन्म : 9 डिसेंबर, रंगपूर जिल्हा, बांग्लादेश मृत्यू : 9 डिसेंबर 1932 कोलकाता ...