मोठी राजकीय घडामोड! काँग्रेसला डिलिमिटेशनवरून जबर धक्का; आणखी एक पक्ष साथ सोडणार?
डिलिमिटेशनच्या चर्चेदरम्यान मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसला डिलिमिटेशनवरून जबर धक्का बसण्याची शक्यताआहे. आता आणखी एक पक्ष साथ सोडण्याची चर्चा आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेसला आणखी झटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि झारखंडमध्ये मोठा भावाची भूमिका निभावणारा झारखंड मुक्ती मोर्चा विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एकीकडे इंडिया आघाडी या विधेयकाच्या विरोधात आहे. जेएमएम पक्षाने अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. परंतु त्यांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
हेमंत सोरन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष हा इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. झारखंड मुक्ती मोर्चा 6 खासदार आहेत. त्यांचे तीन खासदार लोकसभेत आहेत. तर तीन राज्यसभेत आहे. डिमिलिटेशन विधेयकावरून हेमंत सोरन यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हे विधेयकात राज्याच्या हिताचं रक्षण, अनुसूचित जमातींचं प्रतिनिधित्वावर चर्चा करणार आहे.
जेएमएमच्या राज्यसभा खासदार महुआ यांनी विधेयकावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, ‘आम्ही शुक्रवारी रात्री विधेयकाच्या प्रती मिळाल्या. मुख्यमंत्री सोरेन यांनी सर्व खासदारांना सांगितलं की, त्यांनी या विधेयकाचा अभ्यास करावा. या विधेयकामध्ये झारखंडचं हित आहे का, हे तपासून घ्यावे. या विधेयकावरून तज्ज्ञ मंडळीचा देखील सल्ला घेतला जाणार आहे. अभ्यासानंतर एक दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
काँग्रेस पक्ष अडचणीत
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. डिमिलिटेशनवरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आलं. आता राहुल गांधी आणि इतर नेते मुंबईत पोहोचले आहेत. सर्व नेते शरद पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. इंडिया आघाडीची सर्व नेते मुंबईत पोहोचले आहेत. विमानतळावर नेत्यांच्या स्वागतासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते पोहोचले आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर सर्व नेते मंडळी शरद पवार यांना भेटणार आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.