राहुल गांधी राष्ट्रपती भवनाकडे तर प्रियंका गांधींसह खासदारांचा विजय चौकातच ठिय्या, दिल्लीत पुन्हा वातावरण तापलं

दिल्लीमध्ये आता पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. इंडिया आघाडी सलग चौथ्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मैदानात उतरली आहे. आज इंडियाचे खासदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी राष्ट्रपती भवनाकडे तर प्रियंका गांधींसह खासदारांचा विजय चौकातच ठिय्या, दिल्लीत पुन्हा वातावरण तापलं
INDIA bloc Parliament House meeting
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 8:25 PM

इंडिया आघाडीची संसद भवनात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पत्रावर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर आता इंडिया आघाडीचे हे नेते आज राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. राहुल गांधी आणि इतर सर्व खासदार यावेळी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले होते. यावेळी पोलिसांनी अडवण्यात आलं. या सर्व खासदारांनी राष्ट्रपतींची आठ वाजता भेट मागितली होती. मोठ्या संख्येनं पोलिस तैनात आहेत. पण केवळ १० नेत्यांचं शिष्टमंडळच राष्ट्रपतींना भेटू शकतं, असं सांगण्यात आल्यानंतर खासदारांना अडवलं होतं. राहुल गांधी आणि निवडक १० नेते राष्ट्रपतीच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे ते पायीच गेले आहेत.

खासदारांनी यावेळी ज्ञानेश कुमारांच्या अटकेचीही मागणी केली आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, मनोज झा, एम. ए. बेबी, डी राजा, राजीव राय, ओमर अब्दुल्ला, थोर थिरूवलम या  सर्व ने १० नेत्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला गेलं आहे.

Loading...

सोमवारपासून आणखी मोठ्या जोशात हे आंदोलन करु, ज्ञानेश कुमारांना सुट्टी नाही. त्यांचा राजीनामा झालाच पाहीजे. त्यांना अटकही झाली पाहीजे, यावर आमचे एकमत झाले असून सर्व इंडिया आघाडी एकत्र आहे आणि आम्ही त्यासाठी निवेदन देण्यासाठीच राष्ट्रपतींच्या भेटीला चाललो आहोत, असं यावेळी उपस्थित खासदारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या या बैठकीमध्ये एसआयआरची प्रक्रिया पूर्णपणे रद्द झाली पाहीजे. शनिवारी रविवारी सुट्टी असल्याने आता सोमवारीही हे आंदोलन सुरु राहणार आहे. देशाचं संविधान, लोकशाही, लोकांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहिला पाहीजे, यासाठी हे आमचं आंदोलन सुरु असल्याचं इंडिया आघाडीच्या खासदारांनी स्पष्ट केलं आहे.

ज्ञानेश कुमारांचे दिवस भरले आहेत. आता त्यांनी राजीनामा झाला पाहिजे. इव्हिएम मशीनवरही बंदी आली पाहिजे, अशा प्रकारची मोठ्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती काही नेत्यांनी दिली. हा मुद्दा सभागृहातही चर्चेला आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us