सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिक भिडले; चीनचे 20 सैनिक जखमी

| Updated on: Jan 25, 2021 | 12:35 PM

भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. (india-China Clash news of skirmish between Indo China troops)

सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिक भिडले; चीनचे 20 सैनिक जखमी
चीन-भारत बॉर्डर
Follow us on

नवी दिल्ली: भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. नियंत्रण रेषेवर चीनने सैनिकांचा फौजफाटा जमवलेला असतानाच तीन दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवांनानी चिनी सैनिकांचा हा प्रयत्न हाणून पडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 20 चिनी सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. (india-China Clash news of skirmish between Indo China troops)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये तीन दिवसांपूर्वी सिक्कीम येथील नाकुला येथे ही धुमश्चक्री उडाली. चिनी सैनिकांच्या गस्ती पथकाने भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यात चीनच्या सैनिकांना गंभीर दुखापत झाली आहे. चीनचे 20 सैनिक जखमी झाले असून काही भारतीय जवानही जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिलेला नाही. या घटनेनंतर सिक्कीममध्ये तणावपूर्ण वातावरण झालं होतं. मात्र, आता परिस्थिती निवळल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पूर्व लडाखमध्ये सैन्याची जुळवाजुळव

दरम्यान, भारत आणि चीनमधील तणाव निवळण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर 2020मध्ये करार केला होता. मात्र कुरापतखोर चीनने या कराराचं उल्लंघन करणं सुरू केलं आहे. चीनने या कराराचा भंग करत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची जमावजमव केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

 

चीनी सैन्याने 21 सप्टेंबर 2020 रोजी चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर संयुक्त निवेदन जारी केलं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्यबळ न वाढवण्याचा आणि कुणाच्याही भूमीवर कब्जा न करण्याचं या निवेदनाद्वारे जारी करण्यात आलं होतं. यावेळी भारत आणि चीनने एकमेकांचा विश्वास घात न करता कराराचं पालन करण्याचाही निर्णय घेतला होता. आता चार महिने उलटत नाही तोच त्या निवेदनाच्या उलट भूमिका घेत चीनने पूर्व लडाखमध्ये सैन्याची जुळवाजुळव केली आहे. चीनच्या या कुरापतीमुळे भारतासमोरही कोणताच पर्याय उरला नाही. त्यामुळे भारताने तणावग्रस्त भागात सैन्याची जुळवाजुळव केली आहे. काही सेक्टर्समधील चीनकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडूनही महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. (india-China Clash news of skirmish between Indo China troops)

राहुल गांधींची टीका

भारताच्या हद्दीत चीन घुसखोरी करत आहे. पण 56 इंचीची छाती असणारे गेल्या काही महिन्यापासून चीनच्या कुरापतींवर मौन बाळगून आहेत. त्यांनी एक शब्दही उच्चारलेला नाही. कदाचित ‘चीन’ हा शब्द शिकण्याचा ते प्रयत्न करत असतील, अशी खोचक टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता केली आहे.

 

संबंधित बातम्या:

चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला

नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी

ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष म्हणतात, थँक्यू इंडिया, तेही संजीवनी घेऊन आलेल्या हनुमानाच्या फोटोसह, वाचा सविस्तर

(india-China Clash news of skirmish between Indo China troops)