India Corona Update : गेल्या 24 तासात 17073 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 21 जणांचा मृत्यू!

16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. जवानांचे लसीकरण गेल्या वर्षी 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले. कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 रोजी 60 वर्षांवरील लोकांसाठी आणि 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आजारी व्यक्तींसाठी सुरू झाला.

India Corona Update : गेल्या 24 तासात 17073 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 21 जणांचा मृत्यू!
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, 2382 नवे कोरोना रुग्ण, तर मृत्युंचा आकडाही चिंता वाढवणारा
Image Credit source: heedgemarkets.com
| Updated on: Jun 27, 2022 | 10:50 AM

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रूग्णसंख्येत मोठी वाढत झालीयं. गेल्या 24 तासात कोरोनाचे 17073 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 21 कोरोना रूग्णांचा जीव गेलायं. देशातील एकूण रूग्णसंख्या आता 4,34,07,046 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) ही माहिती दिली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींचे 197.11 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील दैनिक संसर्ग दर 5.62 टक्के आहे, तर साप्ताहिक संसर्ग (Infection) दर 3.39 टक्के आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4,27,87,606 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

पाहा आकडेवारी काय सांगते

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटंले आहे की, गेल्या 24 तासांमध्ये 3.03,604 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशात 7 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना संसर्ग रूग्णांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 2020 रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर 2020 रोजी देशात ही प्रकरणे एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी 4 मे रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली होती. यावर्षी 25 जानेवारीला या चार कोटींचा आकडा पार केला आहे.

कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ

16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. जवानांचे लसीकरण गेल्या वर्षी 2 फेब्रुवारीपासून सुरू झाले. कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च 2021 रोजी 60 वर्षांवरील लोकांसाठी आणि 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आजारी व्यक्तींसाठी सुरू झाला. 1 एप्रिल 2021 रोजी 45 वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. गेल्या वर्षी 1 मे पासून, 18 वर्षांवरील सर्व लोकांना अँटी-कोरोना लस घेण्याची परवानगी होती. मात्र, लसीकरण मोहिम जोरदार सुरू असताना देखील कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसते आहे.