5th Generation Fighter Jet : भारतात सुरु झालाय स्वदेशी फायटर जेटचा प्रोग्रॅम, हे विमान इतकं घातक असेल की…
5th Generation Fighter Jet : भारताला चीन आणि पाकिस्तानचा शेजार लाभला आहे. भारताचे हे दोन्ही शेजारी कुरापतखोर असून भारतविरोधात त्यांनी हातमिळवणी केली आहे. चीन-पाकिस्तान दोघेही भारताविरोधात कधी काय करतील याचा नेम नसतो. भारताने याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. या अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी भारत आता एका खास युद्ध विमानाची निर्मिती करत आहे.

भारताची आता वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे भारताच मुख्य लक्ष्य आहे. त्या दृष्टीनेच भारतात आता एका स्वदेशी फायटर विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनला कडवी टक्कर देता येईल. चीनवर जरब बसवण्यासाठी भारत पाचव्या पिढीच AMCA फायटर विमान बनवणार आहे. 2028 पर्यंत स्वदेशी बनावटीच्या Advanced Medium Combat Aircraft च पहिलं प्रोटोटाइप बनवण्याची योजना आहे. भारताच हे पाचव्या पिढीच पहिलं AMCA स्टेलथ फायटर जेट असेल. या विमानाच जवळपास 27 टन वजन असेल. हे विमान जास्त वजनाची शस्त्र घेऊन उड्डाण करण्यासाठी सक्षम असेल.
पाचव्या पिढीच स्टेल्थ फायटर जेट AMCA बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटीने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठी 15 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इंडियन एअर फोर्स आणि DRDO मध्ये या संदर्भात नुकतीच बैठक झाली. तिथे AMCA ची डिजाईन, डेवलपमेंट आणि योजनेबद्दल सविस्तर चर्चा झाली. या विमान निर्मिती प्रोजेक्टच्या आराखड्याचा बारकाईने आढावा घेण्यात आला.
कसं असेल हे विमान?
AMCA हे खास क्षमतांनी सुसज्ज असलेलं फायटर जेट असेल. शत्रुला हे विमान ट्रॅक करता येऊ नये, यासाठी त्यामध्ये काही खास फिचर्स असतील. जनरल इलेक्ट्रिक 414 (GE-414) दोन इंजिन असतील. AMCA विमान बनल्यानंतर भारताचा अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत समावेश होईल.
इंडियन एअर फोर्सची योजना काय?
शेजारी देशांकडून असलेली आव्हान लक्षात घेता भारताला हे फायटर जेट लवकरात लवकर विकसित करायचं आहे. या प्रोजेक्टमध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या सुद्धा सहभागी होतील. 65 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याच्या दृष्टीने AMCA विमान बनवण्यात येईल. इंडियन एअर फोर्स आणि भारतीय नौदलासाठी हे विमान विकसित करण्यात येईल. इंडियन एअफोर्स AMCA विमानाच्या 7 स्क्वॉड्रन बनवण्याचा विचार करत आहे.
भारताकडे सध्या कुठलं सर्वाधिक घातक फायटर विमान आहे?
अमेरिकेकडे F-35 आणि रशियाकडे Su-57 च्या रुपाने पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर विमाने आहेत. भारताकडे सध्या सर्वात अत्याधुनिक म्हणजे राफेल फायटर विमान आहे. 4.5 जनरेशनच हे विमान फ्रान्सकडून विकत घेतलय.
