मोठी बातमी! भारत हे हिंदू राष्ट्रच, जाहीर कधी करणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं थेट उत्तर

RSS chief Mohan Bhagwat : भारत हा अखंड आहे आणि हे हिंदू राष्ट्रच आहे, असे मोठे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. अर्थात गेल्या दहा वर्षांत हिंदू राष्ट्राची चर्चा बळावली आहे. पण कधी होणार हे हिंदू राष्ट्र, काय म्हणाले डॉ. भागवत?

मोठी बातमी! भारत हे हिंदू राष्ट्रच, जाहीर कधी करणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं थेट उत्तर
डॉ.मोहनराव भागवत
| Updated on: Aug 29, 2025 | 8:47 AM

भारत हे अखंड आणि हिंदू राष्ट्रच असल्याचा मोठा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने देशात हिंदू राष्ट्राची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या मुद्दावर अनेक गट-तट आहे. अर्थात गेल्या दहा वर्षांत हिंदू राष्ट्राची चर्चा होत आहे. त्यात सरसंघचालकांच्या विधानाने देशात काही मोठं होणार का? यावर खल सुरू झाला आहे. पण भारत कधी होणार हिंदू राष्ट्र, याविषयी डॉ. भागवत यांनी काय भूमिका जाहीर केली?

संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. या बौद्धिकाला आणि शिस्तबद्ध कॅडरला 100 वर्षे झाली. त्यानिमित्त दिल्लीत तीन दिवसीय व्याख्यानमाला सुरू आहे. 100 वर्षांची संघाची यात्रा -नवीन क्षितीज हे या व्याख्यानमालाचे सूत्र आहे. या मंचावरून अनेक विषयावर सरसंघचालकांनी थेट मतं मांडली. संघाविषयीचा समज,गैरसमज यावर त्यांनी विस्तृत चर्चा केली. संघाच्या स्थापनेमागची भूमिका मांडली. त्यांनी संघाविषयीच्या अनेक प्रश्न, कुतुलह, तिरकस प्रश्नांचे निरासन करण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत हे हिंदू राष्ट्र

भारत हा अखंड आहे. हेच जीवनाचे तथ्य आहे. आपले पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी हा आपल्या एकजुटतेचा दूवा आहे. अखंड भारत ही राजनीती नाही. हे सार्वजनिक मत आहे. भारत हा अखंड आहे आणि ते हिंदू राष्ट्र आहे ही भावना ज्यावेळी जागृत होईल त्यावेळी सर्वच सुखी होतील. येथे शांतता नांदेल. संघ हा कुणाचा विरोधी नाही. हा चुकीचा विचार प्रसव झाला आहे. आपले सर्वांचे पूर्वज आणि संस्कृती एकच आहे. पूजा पद्धत भिन्न आहे. पण ओळख एकच आहे. विविध संप्रदाय, पंथात आपआपसातील विश्वास कायम ठेवण्याची क्षमता सर्वच पक्षांमध्ये आहे. मुसलमानांनी ही शंका सोडून द्यावी की ते जर या पंरपरेत सहभागी झाले तर त्यांचा इस्लामशी संबंध संपेल.

भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. मग ते जाहीर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत सरसंघचालकांनी या व्याख्यानमालेत मांडले. ऋषी आणि मुनींनी, संतांनी, विभूतींनी हे हिंदू राष्ट्र असल्याचे अगोदरच घोषीत केलेले आहे. त्यासाठी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याची काय गरज आहे. हे तर ढळढळीत सत्य आहे. हे मानले तर तुमचा लाभ आहे आणि तुम्ही नाही मानलं तरी काही नुकसान नाही, असे सरसंघचालक म्हणाले.

संघ चांगल्या कार्यात अग्रेसर

स्वातंत्र्य संग्राम असो वा विविध सामाजिक आंदोलनं असोत संघाची भूमिका रेखांकित आहे. सामाजिक आंदोलनात संघाने कधी वेगळा झेंडा हाती घेतला नाही. दिखावा केला नाही. जिथे चांगलं काम सुरू आहे. जिथे मदतीची गरज आहे, तिथे स्वयंसेवक सेवा देऊ शकतो. त्यासाठी त्यांना सवलत आहे. ते सहकार्य करू शकतात. तिथे जात-पंथ,धर्माचा अडथळा कधी येत नाही. संघ ही काही केंद्रिय व्यवस्था नाही. सोबत असलेल्या सर्व संस्था या स्वतंत्र आणि आत्मनिर्भर आहेत. तुम्हाला ही संघ आणि सहकारी संस्थांमध्ये मतभेद दिसले असतील. पण हा सत्य शोधण्याचा प्रयत्न आहे. संघर्ष हा प्रगतीचा साधक आहे. त्यामुळे या सर्व सहकारी संस्था या निःस्वार्थ भावनेतून एकाच गंतव्याकडे, एकाच ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी भूमिका सरसंघचालकांनी मांडली.

विरोधी मताचा ही आदर

संघ हा विरोधी मताचा आदर करतो. त्यांनी काही सदोहरण देत अनेकांचे संघाविषयीचं मत आणि भूमिका बदलल्याचे सांगितले. प्रणब मुखर्जी, जयप्रकाश नारायण यासारख्या प्रखर बुद्धिवादी व्यक्तींनी त्यांची मतं बदलली आहेत. त्यांना संघाची कार्यपद्धती भावली. चांगल्या कार्यासाठी संघ सेवेस, मदतीस नेहमी तत्पर असतो. पण जर समोरून अडथळा आला त मग संघ समोरच्याच्या इच्छेचा आदर करत बाजूला हटतो. आम्हाला नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हायचे आहे. उदरनिर्वाहसाठी नोकरी गरजेची आहे, ही धारणाच संघाला समूळ नष्ट करायची आहे, असे सरसंघचालकांनी म्हटले. देशात श्रमाला पुन्हा प्रतिष्ठा मिळण्याचे संघाचे धोरण आहे. कामातील उच्च-निच्चतेमुळेच समाजाचे पतन झाले आहे. तरुणांमध्ये आपले कुटुंब,समाजाला नेटाने उभं करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे आपण जगालाही मार्गदर्शन करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षणावर स्पष्ट भूमिका

आरक्षण हा काही तर्काचा विषय नाही तर संवेदनशीलतेचा विषय आहे. जर अन्याय होत असेल तर मग त्याचे परिमार्जन होणे गरजेचे आहे. तो अन्यया दूर होणे आवश्यक आहे. राज्यघटनेनुसार, जे आरक्षण देण्यात आले आहेत, त्याला संघाने अगोदरच पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही संघाची ही भूमिका बदलणार नसल्याचे सरसंघाचलाकांनी अश्वस्थ केले.

1972 मध्येच अनेक धर्माचार्यांनी, धर्मप्रुखांनी हे स्पष्ट केले की, हिंदू धर्मात स्पृश्य-अस्पृश्यतेला थारा नाही. जर एखाद्या ठिकाणी जातीआधारीत भेदभावांचा उल्लेख मिळत असेल तर ते चुकीचे आहे.हिंदूचा एक धर्म ग्रंथ नाही. ज्याआधारे सर्व त्याच एका मार्गावरुन जातील. पण या विविधतेतच भारताच्या एकतेचे यमक आणि गमक आणि सांस्कृतिक मिलापाचे गणित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.