India maldive : मालदीवचा भारताच्या बाजुने मोठा निर्णय, चीनला बसला धक्का

India maldive relation : भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मालदीवमधील मुइज्जू सरकारचे सूर आता बदलले आहेत. मालदीवला भारतापासून तोडण्यासाठी चीनने डाव आखला आहे. पण त्यामध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अडकणार का याकडे जगाचं लक्ष लागलं आहे, असं असतानाच भारताचा एक मोठा विजय झाला आहे.

India maldive : मालदीवचा भारताच्या बाजुने मोठा निर्णय, चीनला बसला धक्का
| Updated on: Feb 27, 2024 | 4:14 PM

India maldive : मालदीव आणि भारत यांच्यात तणाव सुरु असताना भारताचा पुन्हा एकदा मोठा राजनैतिक विजय झाला आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाचा मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने भारतीय वैमानिकाला मालदीवमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी दिली आहे. मालदीवने हा निर्णया घेतल्यामुळे चीनचा नक्कीच मिर्ची लागणार आहे. कारण चीन भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण चीनच्या या प्रयत्नांना भारताने झटका दिला आहे.

मालदीवकडून परवानगी

मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनात असे म्हटले आहे की, भारताने मालदीवला जे हेलिकॉप्टर भेट म्हणून दिले होते. त्याचे संचालन करण्यासाठी भारतीय नागरिकांचा एक गट मालदीवमध्ये येत आहे. भारताने हे हेलिकॉप्टर मालदीवला आपत्कालीन आरोग्य सुविधांसाठी दिले आहे. अलीकडेच मालदीवच्या विरोधी पक्षनेत्यांनी या हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवल्याबद्दल मुइज्जू सरकारवर जोरदार टीका केली होती.

मुइज्जू हे भारताविरोधात भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर त्यांच्यात देशातून टीका होऊ लागली आहे. विरोधक त्यांंना अपरिपक्व नेता म्हणून संबोधित आहेत. मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. चीन सोबत मैत्री करुन त्यांना चीनकडून आणखी मदत घ्यायची आहे. पण आधीच कर्जात बुडालेल्या मालदीवला चीनकडून कर्ज घेऊ नये असा आयएमएफने आधीच इशारा दिला आहे. कारण चीन अशाच प्रकारे कर्ज देऊन छोट्या देशांना गुलाम करत आला आहे.

भारतासाठी मालदीव महत्त्वाचे का?

मालदीव हा भारतासाठी इतका महत्त्वाचा का आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हिंद महासागरात असलेल्या मालदीवचे स्थान खूप महत्त्वीचे आहे. भौगोलीकदृष्ट्या हिंद महासागरात वर्चस्व ठेवण्यासाठी मालदीवसोबत चांगलं संबंध ठेवणं भारतासाठी फायद्याचे आहे. हिंदी महासागराला राजनैतिकदृष्ट्या ‘इंडियाज बॅकयार्ड’ म्हटले जाते.

मालदीव सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हेलिकॉप्टर चालवण्यासाठी आता भारतीय वैमानिक अड्डू शहरात येणार आहेत. GAN विमानतळावर उभी असलेली भारतीय हेलिकॉप्टर आता भारतीय नागरिक उडवणार आहेत. दुसरीकडे भारतानेही मालदीवसाठी बजेट वाढवले ​​आहे. भारताने 2024-25 या वर्षासाठी मालदीवसाठी 6 अब्ज रुपयांची तरतूद केली होती, परंतु नंतर ती वाढवून 7.8 अब्ज रुपये करण्यात आली.