AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा त्यांच्याच देशातून झटका, भारताबाबतचा खोटारडेपणा उघड

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडत असताना मालदीवमधील विरोधी पक्षाच्या नेत्याच राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा खोटारडेपणा उघड केला आहे. मुइज्जू हे खोटा दावा करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पाहा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय सैनिकांबाबत काय केला होता खोटा दावा.

India maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा त्यांच्याच देशातून झटका, भारताबाबतचा खोटारडेपणा उघड
| Updated on: Feb 26, 2024 | 3:21 PM
Share

India maldive row : मालदीव आणि भारत या दोन देशांमधील तणाव वाढत असताना आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. मालदीव आणि भारत यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून चांगले संबंध राहिले आहेत. भारताने नेहमीच छोट्या देशांना मदत केली आहे. ज्यामध्ये मालदीवचा देखील समावेश आहे. पण आता मालदीवमध्ये नवीन सरकार आल्याने त्यांनी भारतासोबतचे संबंध बिघडवले आहे. कारण सत्तेत आलेले मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. त्यामुळेच ते भारतापेक्षा चीनला अधिक महत्त्व देत आहेत. त्यातच आता मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मुइज्जू सरकारचे आणखी एक खोटे उघड केले आहेत. मालदीवमध्ये हजारो भारतीय सैनिक असल्याचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा दावा त्यांनी खोडून काढला आहे.

शाहीद अब्दुला यांचं ट्विट

शाहीद म्हणाले की, देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक तैनात नाहीत. मुइज्जूच्या हे खोटे बोलत आहेत. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी सोशल मीडिया साइट X (ट्विटर) वर ही पोस्ट शेअर केली आहे. मुइज्जू सरकारने मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैन्याच्या संख्येबाबत खोटा दावा केला आहे.

मालदीवच्या नेत्याने लिहिले की, ‘राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी केलेला ‘हजारो भारतीय सैनिकांच्या उपस्थितीबाबतचा’ दावा खोटा आहे. भारतीय सैनिकांची नेमकी संख्या सांगण्यास मुइज्जू सरकार अस्पष्टपणे बोलत आहेत. देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक नाही. पारदर्शकता महत्त्वाची आहे असून सत्य बाहेर आले पाहिजे.’

चीन समर्थक आहेत मुइज्जू

मोहम्मद मुइज्जू हे नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांच्या माघारीचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्तेवर आल्यास भारतीय सैनिकांना परत पाठवू असे त्यांनी म्हटले होते. पण हे भारतीय सैनिक त्यांच्याच मदतीसाठी तेथे तैनात आहेत हे मुइज्जू विसरले असावेत.

राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी भारत सरकारला देशातून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत भारत सरकारसोबत करार झाला असल्याची घोषणा केली होती. आता ते म्हणाले की, भारतीय सैनिक लवकरच भारतात परतणार आहेत.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.