India-maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुका जिंकण्यासाठी भारताविरोधात नवी चाल

Maldives president new move : मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी आपल्याच देशात खोटा प्रचार सुरु केला आहे. भारताविरोधात त्यांनी आता आणखी एक भूमिका घेतली आहे. ज्यातून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. भारतीय जवानांना भारतात माघारी बोलवण्याचा निर्णय आधीच झाला असला तरी त्याचं ते गैरफायदा घेताना दिसत आहेत.

India-maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुका जिंकण्यासाठी भारताविरोधात नवी चाल
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 7:09 PM

India -maldive row : भारत आणि मालदीव यांच्यात तणाव वाढलेला असताना भारताने देखील आतापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनकडून समर्थन मिळत असल्याने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेले भारतीय जवानांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्या आहेत. पण असं असलं तरी हे वाटते तितके सोपे नाहीये. मुइज्जू यांनी म्हटले आहे की, देशातून 80 भारतीय सैनिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय हा संसदेतील बहुमतावर अवलंबून आहे. पुढील महिन्यात संसदेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय सैनिकांना परत पाठवायचे असेल, तर लोकांना विचारपूर्वक मतदान करावे लागेल. असं देखील ते म्हणाले आहेत.

चीन समर्थक मानले जाणारे मुइज्जू यांनी गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारात याच मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षाला संसदेत बहुमत नाही. त्यामुळे त्यांना हा मुद्दा पुन्हा पुढे आणत निवडणुका जिंकायच्या आहेत. दोन्ही देशांदरम्यान करार झाला आहे की भारतीय सैनिक 10 मे पर्यंत त्यांच्या देशात परत येतील आणि मालदीवचे रेस्क्यू युनिट भारतीय तांत्रिक कर्मचारी चालवतील.

17 मार्च रोजी संसदीय निवडणुका

मुइज्जू म्हणाले की, मालदीव सरकार संसदेत बहुमताशिवाय भारतीय सैनिकांना परत पाठवू शकत नाही. त्यासाठी पुढील निवडणुकीत बहुमत मिळवावे लागेल. हे सैनिक शोध आणि बचाव कार्यात आपल्या सैनिकांना मदत करतात. दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याबाबत करार केला आहे. परंतु, मजलिसमध्ये (संसदेत) बहुमत मिळाल्यावरच आम्ही अंतिम निर्णय घेऊ शकू.

आम्ही सैन्य मागे घेण्याच्या मुद्द्यावर भारतासोबत लेटर ऑफ एक्सचेंजवर स्वाक्षरी केली आहे. हे काम 10 मे पर्यंत पूर्ण करायचे आहे. भारतानेही या मुद्द्यावर आम्हाला आश्वासन दिले आहे. परंतु, तरीही सत्य हेच आहे की 17 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या निकालांवर सर्व काही अवलंबून आहे आणि लोकांनी मतदान करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

मालदीवच्या वृत्तपत्राचा दावा

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मालदीवच्या वृत्तपत्रात भारतीय सैन्याच्या माघारीच्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्षांचे विधान खरे नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, जेव्हा भारतीय सैनिक मालदीवमध्ये आले होते तेव्हाही त्यात संसदेची भूमिका नव्हती आणि हा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. आता भारतीय सैनिकांच्या माघारीचीही तीच स्थिती आहे. मुइज्जूने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात संसदेची भूमिका नाही. याबाबत अध्यक्ष चुकीची माहिती देत ​​आहेत.

मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की भारतीय सैनिकांची पहिली तुकडी 10 मार्चपर्यंत देशात परत येईल. भारत आणि मालदीव यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी एक कोर ग्रुप तयार केला होता.

भारतीय हेलिकॉप्टर आणि विमाने तेथील लोकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करत राहतील अशी व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न भारताने केला आहे.

मालदीवमध्ये असलेले 80 भारतीय सैनिक दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे ऑपरेशन हाताळतात. जे सहसा ते बचाव किंवा सरकारी कामांमध्ये वापरले जातात. मुइझू नोव्हेंबर 2023 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले आणि तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.