140 किमीच्या वेगाने विनाशकारी वादळ धडकणार, शाळा सुट्टी जाहीर, थेट हवामान विभागाने..
नुकताच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. चक्रीवादळाचा हा इशारा देण्यात आला. अनेक राज्यात धो धो पाऊस कोसळणार आहे. वेगाने वारे धडकणार असून मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाट असेल. त्यातच प्रशासनाने मोठा निर्णय घेतला.

बंगालच्या उपसागरात मोठे वादळ आले. ज्यानंतर पूर्व भारतातील किनारपट्टीच्या भागासाठी मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या प्रणालीचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होऊ शकते, याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान वादळाचा वेग हा 115 ते 125 किलोमीटर असू शकतो, ज्यामुळे हे वारे थैमान घालू शकते, असा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग हा ताशी 140 च्या पुढे जाण्याचीही शक्यता आहे. किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला. तब्बल 10 हून अधिक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये उद्या सकाळपासूनच पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच दक्षता म्हणून या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
ओडिसातील पाच जिल्ह्यांना याचा मोठा धोका आहे. यादरम्यानच प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्र यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुद्दुचेरीमधील स्थिती अधिक गंभीर आहे. समुद्रातही सतर्कता वाढवण्यात आली. तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरातील नऊ बंदरांवर चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून अलर्ट जारी करण्यात आला.
महाराष्ट्रातील काही भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व-मध्य आणि त्याला लागून असलेल्या आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. 24 ऑक्टोबरला अधिक तीव्र होऊन ‘प्रेशनमध्ये रूपांतरित झाले. हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असून, त्याचे रूपांतर प्रथम डीप डिप्रेशनमध्ये झाले. ज्यामुळे मोठे वादळ येईल.
चक्रीवादळासह जोरदार पाऊस यादरम्यान होईल. राज्यात यंदा प्रचंड मोठा दुष्काळ आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. राज्यातून मॉन्सून गेला असला तरीही अनेक हवामान तज्ज्ञांकडून पावसाचा इशारा दिला जात आहे. त्यातच आता या चक्रीवादळामुळे पाऊस येणारअ असून जोराने वारे वाहण्याचीही शक्यता आहे.