IAF Chief Ap Singh : अजून विलंब झाला तर मग..एअर फोर्सच्या स्थितीबद्दल एअर चीफ मार्शल परखडपणे बोलले
IAF Chief Ap Singh : एअर चीफ मार्शल एपी सिंह हे स्पष्टपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. इंडियन एअर फोर्सच्या सध्याच्या स्थितीबद्दल त्यांनी परखडपणे आपलं मत मांडलं आहे. सरकारने याची दखल घेणं जास्त गरजेचं आहे.

इंडियन एअर फोर्सचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी शनिवारी फायटर जेट्सच्या स्क्वाड्रनबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. ते वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. एअर फोर्सला दरवर्षी 36 ते 40 विमानं म्हणजे जवळपास दोन स्क्वाड्रन्सच्या समावेशाची आवश्यकता आहे. अत्यंत वेगाने या स्क्वाड्रान्सचा समावेश करण्याची गरज आहे. “डिफेन्स प्रोजेक्टमध्ये होणाऱ्या विलंबामुळे थेट ऑपरेशनल क्षमतेचं नुकसान होऊ शकतं. टेक्नोलॉजीमध्ये विलंबाचा अर्थ टेक्नोलॉजी नाकारण्यासारखं आहे. विकास आणि उत्पादनाला इतका उशीर होणार असेल, शत्रू पुढे निघून गेला तर टेक्नोलॉजीच महत्व संपून जातं” असं एपी सिंह म्हणाले. लवकरच एअर फोर्स डे आहे. स्क्वॉड्रन कमतरता भरुन काढण्यासाठी एअर चीफने अनेक प्रोजेक्ट्सचा उल्लेख केला. यात तेजस मार्क-1ए, तेजस मार्क-2, 114 फायटर जेट्स खरेदीचा प्रस्ताव आणि पाचव्या पिढीच्या AMCA प्रोजेक्टचा उल्लेख केला. AMCA आणि अन्य प्रोजेक्टला विलंब झाला तर मग पर्यायी फायटर जेट्स खरेदी करावे लागतील.
रशियाकडून वारंवार SU-57 च्या खरेदीची ऑफर दिली जात आहे. पण यावर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. ठरवल्यानुसार सर्व प्रोजेक्ट्स पूर्णत्वाला गेले तर एअर फोर्सच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. HAL दरवर्षी 24 पेक्षा अधिक जेट्स बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. MRFA कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर आवश्यक इंडक्शन रेट गाठता येईल. या सगळ्या परिस्थितीतही इंडियन एअर फोर्सची शत्रुशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी आहे.
त्याने चर्चेची दिशा बदलली
थिएटर कमांडच्या मुद्दावरही एअर चीफने स्पष्ट केलं की, “इंडियन एअर फोर्स या विरोधात नाहीय. फक्त रचना आणि अमलबजावणी या बाबतीत सावधता बाळगण्याची आवश्यकता आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी जो अनुभव आला, त्याने चर्चेची दिशा बदलली आहे. नव्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या स्थापनेनंतर या मुद्यावर पुन्हा विचार होईल” “थिएटर कमांड एकाचवेळी लागू करायची कि, टप्प्याटप्प्याने. ऑपरेशनल दृष्टीने प्रभावी ठरावी अशी रचना असली पाहिजे” असं एअर चीफ मार्शल म्हणाले.
पाचव्या पिढीच्या फायटर जेटसाठी पाकिस्तान-चीनच्या सहकार्यावर काय म्हणाले?
पाचव्या पिढीच्या फायटर जेटसाठी पाकिस्तान आणि चीनमध्ये सहकार्यावर एअर चीफने चिंता व्यक्त केली. फक्त विमान नाही, तर संपूर्ण नेटवर्कमधील समन्वय त्यावर प्रभाव ठरतो. फ्लायदुबईच्या घटनेतील भारतीय वैमानिकाच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. इंडियन एअर फोर्सला या वैमानिकावर गर्व असल्याचं ते म्हणाले.
