Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 8,822 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 15 जणांचा मृत्यू!

| Updated on: Jun 15, 2022 | 10:09 AM

मुंबईत मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत 600 पेक्षा जास्त वाढ झाली आणि संसर्गामुळे दोन रूग्णांचा मृत्यू देखील झालाये. मुंबईतील कोरोना संसर्गाची संख्या आता 10,83,589 वर गेली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19,575 वर पोहोचली आहे.

Corona Update | भारतात गेल्या 24 तासांमध्ये 8,822 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, 15 जणांचा मृत्यू!
Image Credit source: hindustantimes.com
Follow us on

मुंबई : कोरोना (Corona) रूग्णांची संख्या सातत्याने भारतामध्ये वाढते आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाने 15 लोकांचा जीव गेलायं. यामुळे आता सतर्क राहण्याची आवश्यक्ता आहे. एका दिवसात तब्बल 8,822 नवीन कोरोना रूग्णांची (Patient) नोंद झालीये. तर आता भारतातील कोरोना संसर्गाची संख्या 4,32,45,517 झाली आहे. मृतांचा आकडा 5,24,792 झाला. भारतामध्ये मास्क वापरण्याची सक्ती नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाही, यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरतोय. मुंबईत (Mumbai) मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आलीये. राज्यातील सर्वात जास्त कोरोना रूग्ण हे मुंबईमध्ये आहेत.

मुंबईत 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद

मुंबईत मंगळवारी 1,724 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत 600 पेक्षा जास्त वाढ झाली आणि संसर्गामुळे दोन रूग्णांचा मृत्यू देखील झालाये. मुंबईतील कोरोना संसर्गाची संख्या आता 10,83,589 वर गेली. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 19,575 वर पोहोचली आहे. धोकादायक म्हणजे महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचा व्हायरलच्या BA.5 ची 2 रूग्णे सापडली आहेत, ही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीये. महाराष्ट्रातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या बघता काळजी घेण्यासाठी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे जिल्ह्यातील संसर्ग वाढला

ठाणे जिल्ह्यातील संसर्गाची संख्या 7,15,305 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 11,896 वर पोहोचली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये सातत्याने कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. ठाण्यामध्ये एका दिवसाला जवळपास 300 ते 400 रूग्ण कोरोनाचे मिळत आहेत. ही येणारी आकडेवारी ठाणेकरांची चिंता वाढवणारीच आहे. यामुळे सध्याच्या वातावरणामध्ये शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि घराबाहेर पडताना मास्क वापरा. तसेच मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रूग्णांमध्येही वाढत होताना दिसते आहे.