Corona Update | देशात गेल्या 24 तासांमध्ये 8582 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, मुंबईमध्येही वाढतोय धोका!

अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 8,582 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाली असून एकूण प्रकरणांची संख्या 4,32,22,017 झाली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 44,513 झाली आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 4,143 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार दैनिक सकारात्मकता दर 2.71 टक्के नोंदविला गेला तर साप्ताहिक सकारात्मकता दर देखील 2.02 टक्के नोंदविला गेला.

Corona Update | देशात गेल्या 24 तासांमध्ये 8582 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, मुंबईमध्येही वाढतोय धोका!
Image Credit source: thewire.in
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:41 AM

मुंबई : भारतामध्ये कोरोनाच्या (Corona) रूग्णांची संख्या सतत वाढताना दिसते आहे. आज रविवारी भारतामध्ये 8,582 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीये. ही येणारी आकडेवारी खरोखरच धडकी भरवणारीच आहे. आता देशातील सक्रिय रूग्णांची संख्या 44,513 वर पोहोचली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरायचे बंधन नसल्यामुळे अनेकजण मास्कशिवाय फिरत आहेत. तसेच कोरोनाचे निर्बंध (Restrictions) नसल्यामुळे संसर्ग वाढल्याचे दिसते आहे. मुंबईतही कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. यामुळे जरी मास्क वापरणे बंधनकारक नसले तरीही आपल्या काळजीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग (Infection) रोखण्यासाठी मास्क वापरणे महत्वाचे झाले आहे. तसेच शक्यतो कोरोना टाळण्यासाठी गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे देखील टाळावे.

इथे पाहा आरोग्य मंत्रालयाचे ट्विट

भारतात 8,582 नवीन कोरोना रूग्णांची नोंद

अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 8,582 नवीन कोरोना संसर्ग रूग्णांची नोंद झाली असून एकूण केसेसची संख्या 4,32,22,017 झाली आहे, तर सक्रिय केसेसची संख्या 44,513 झाली आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 4,143 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार दैनिक सकारात्मकता दर 2.71 टक्के नोंदविला गेला तर साप्ताहिक सकारात्मकता दर देखील 2.02 टक्के नोंदविला गेला. महाराष्ट्रामध्येही कोरोना आपले हातपाय पसरतोय. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी 543 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे संसर्ग संख्या 7,13,653 वर पोहोचली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली माहिती

महाराष्ट्रामध्ये 2922 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीये. राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे सध्या मुंबई शहरातील आहेत. भारतामध्ये कोरोनाच्या लसीकरणचा शनिवारी 195 कोटींचा टप्पा ओलांडला, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 11 लाख (11,30,430) हून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या केसेस कमी झाल्यामुळे कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, परत देशातील कोरोना रूग्णांचा आकडा धडकी बसवणारा आहे. मुंबईमध्येही कोरोनाच्या रूग्णांची संख्या सतत वाढताना दिसते आहे. यामुळे धोका अधिकच निर्माण झालाय.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.