
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी 26 पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांकडून झाली होती. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली होती. त्यानंतर भारताने टीआरएफ विरोधात कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरु केली. पहलगाम हल्ल्याच्या एका महिन्यातच भारताने अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाकडे डेजियर दिले होते. त्यामुळेच टीआरएफला दहशतवादी संघटना अमेरिकेने घोषित केले. सूत्रानुसार, टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करणार असल्याची माहिती अमेरिकेने चार दिवसांपूर्वीच भारताला दिली होती.
अमेरिकेची ही घोषणा पाकिस्तानसाठी स्पष्ट संदेश आहे. दशतवादावर झिरो टॉलरेन्स धोरण भारत आणि अमेरिकेचे असणार आहे. त्यामधून कोणालाही सवलत दिली जाणार नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतरही टीआरएफवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे 27-29 मे रोजी वॉशिंग्टन दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात विक्रम मिस्त्री यांनी डोजियर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला दिले होते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीकडेही ही माहिती दिली होती. भारताच्या या पावलानंतर पाकिस्तानचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. ट्रम्प-मुनीर भेटीचाही फायदा झाला नाही.
टीआरएफची सूत्र कमान शेख सज्जाद गुल उर्फ सज्जाद अहमद शेख यांच्याकडे आहे. लश्कर ए तैयबाने कश्मिरी चेहरा बनवून त्याला तयार केले आहे. टीआरएफने २०२० ते २०२४ दरम्यान काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. पहलगाम हल्ल्याशिवाय, मध्ये काश्मीरमध्ये २०२३ मध्ये ग्रेनेड हल्ला, २०२३ मध्ये अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांवर हल्ला, २०२४ मध्ये गंदेरबल हल्लाचा समावेश आहे.
सज्जाद गुल सध्या रावळपिंडीत राहतो. तो मुळचा जम्मू आणि काश्मीरमधील आहे. तो काश्मिरी युवकांची त्याच्या दहशतवादी संघटनेत भरती करतो. त्याचा भाऊ परवेझ अहमद शेख १९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी होता. तो आपल्या परिवारासोबत सौदी अरेबियात गेला. त्यानंतर पाकिस्तानात गेला.